Advertisement

सोशल मीडियावर #Padmanchalleange


सोशल मीडियावर #Padmanchalleange
SHARES
Advertisement

मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅडवर भाष्य करणाऱ्या 'पॅडमॅन' या चित्रपटाला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अक्षय कुमार सध्या नानाविध शक्कल लढवत आहे. नुकतीच त्याने या विषयावर फेसबुक लाईव्हद्वारे एक कविता सादर केली. पॅडमॅन चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहे, असे अरूणाचलम् मुरूगानंदनम यांनी सोशल मीडियावर #Padmanchalleange (पॅडमॅन चॅलेंज) आणलं आहे.


काय आहे हे चॅलेंज?


अरूणाचलम् मुरूगानंदनम यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या या पॅडमॅन चॅलेंजमध्ये सॅनिटरी पॅडसह फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. तो शेअर करताना ज्या व्यक्तीला तुम्हाला हे चॅलेंज द्यायचं आहे, त्याला टॅग करायचं आहे.

अरूणाचलम् यांनी सॅनिटरी नॅपकिन हातात घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि पॅडमॅनमधील कलाकारांना म्हणजेच अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर तसेच निर्माती ट्विंकल खन्नाला टॅग करून चॅलेंज दिलं.


ट्विंकल खन्नाने हे चॅलेंज स्वीकारत आमिर खान आणी शबाना आझमी यांना हे चॅलेंज दिलं.


आमिरने हे चॅलेंज लगेच स्वीकारत 'धन्यवाद मिसेस फनी बोन्स. होय, माझ्या हातात पॅड आहे आणि त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. मासिक पाळी ही नैसर्गिक आहे' असं ट्वीट केलं. त्याचबरोबर त्याने अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि सलमान खान यांनाही हे चॅलेंज दिलं आहे. तर अक्षयने आलिया, दीपिका आणि विराटला हे चॅलेंज दिलं आहे.


अक्षय

आलिया


दीपिकासंबंधित विषय
Advertisement