सड्डा नाम 'लाल सिंह चड्डा'

लेखक विन्सटन ग्रूमच्या १९८६ मध्ये आलेल्या नॉव्हेलवर हा चित्रपट आधारीत आहे. यावरच हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंप आधारीत होता. याच हॉलिवूड चित्रपटाचा 'लाल सिंह चड्ढा' हा अधिकृत रीमेक आहे.

SHARE

आमिर खाननं 'लाल सिंह चड्डा' मधला आपला लूक शेअर केला आहे. आमिर खान यात सरदारजीच्या लूकमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यानं आपली ओळख करून दिली आहे. आमिरनं फोटोसोबत लिहिलं आहे, 'सत श्री अकाल जी, मैं हूं लाल... लाल सिंह चड्डा.' आमिरचा हा चित्रपट ख्रिसमसला २०२० मध्ये रिलीज होणार आहे.

 

लेखक विन्सटन ग्रूमच्या १९८६ मध्ये आलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे. यावरच हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंप आधारीत होता. याच हॉलिवूड चित्रपटाचा 'लाल सिंह चड्ढा' हा अधिकृत रिमेक आहे. ओरिजनल चित्रपटात मुख्य पात्र एवढा हुशार नसतो तरीदेखील तो यश मिळवतो. एकीकडे यश मिळतं पण त्याचं खरं प्रेम त्याला सोडून जातं. या चित्रपटानं ऑस्करमध्ये डझनभर नॉमिनेशन मिळवले होते आणि ऑस्कर अॅवॉर्ड्स जिंकले होते. टॉम हँक्स याला यासाठी सलग दुसऱ्यांदा बेस्ट अॅक्टरचा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. आमिर लाल सिंह चड्ढामध्ये टॉम हॅन्क्सनं साकारलेलं पात्र पुन्हा साकारणार आहे.

हॉलिवूड चित्रपटातील डायलॉग्स प्रचंड हिट झाले होते. या चित्रपटाचा नायक फॉरेस्ट गम्प म्हणतो, 'माझी आई नेहमी म्हणते, आयुष्य चॉकलेटच्या डब्ब्याप्रमाणे आहे.' हा संवाद आजही प्रसिद्ध असलेल्या डायलॉगपैकी आहे. हा चित्रपट १९९४ मध्ये रिलीज झाला होता. आता चित्रपटाचा अभिनेता टॉम हॅन्क्स ६३ वर्षांचा झाला आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या