Advertisement

दीपिका-रणवीरपेक्षा अनुष्का-विराटचा लग्नसोहळा सर्वाधिक लोकप्रिय!

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीनुसार, दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून वायरल झालं.

दीपिका-रणवीरपेक्षा अनुष्का-विराटचा लग्नसोहळा सर्वाधिक लोकप्रिय!
SHARES

विरूश्काच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दीपवीरचंही लग्न झालं. मग अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न जास्त लोकप्रिय की, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचं लग्न जास्त लोकप्रिय यावर मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. आता स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, असं समोर आलं आहे की दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून वायरल झालं.


अनुष्का-विराटला ६१ गुण

गेल्या वर्षी ११ डिसेंबरला अनुष्का-विराटचं लग्न झालं. ९ ते १४ डिसेंबर २०१७ मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, यादरम्यान ट्विटर, वर्तमानपत्रं, वायरल न्यूज आणि डिजिटल न्यूज रँकिंगमध्ये त्यांनी लोकप्रियतेत सर्वाधिक म्हणजेच १०० गुण मिळवले होते आणि ते नंबर वन स्थानी होते. फेसबुकवर मात्र ६१ गुणांसह ही जोडी चौथ्या स्थानी होती. 


दीपवीरला ८८ गुण

नुकतंच १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरचं लग्न झालं. त्या आठवड्यात ट्विटर, वायरल न्यूज आणि डिजिटल न्यूजवर १०० अंकांसह ही जोडी पहिल्या स्थानी होती. तसंच फेसबुक रँकिंगमध्ये ८८ गुणांसह ही जोडी दुसऱ्या स्थानावर होती आणि न्यूजपेपर रँकिंगमध्ये ४५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होती.  


स्कोर ट्रेन्ड्सची अाकडेवारी

दोन्ही लग्नांच्या आकडेवारीकडे बारकाईने पाहिल्यावर लक्षात येतं की, विरूश्का पहिल्या स्थानावर तर दीपवीर लोकप्रियतेत दुसऱ्या स्थानावर आहेत. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधीत आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात की, विराटची लोकप्रियता वैश्विक आहे. यामुळेच त्याच्या लग्नाची बातमी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र, वेबसाइट्स, न्यूज चॅनल्स, मनोरंजन आणि खेळविषयक पोर्टल्सवर झळकल्यानेच दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या तुलनेत विरूश्काचं लग्न जास्त लोकप्रिय ठरलं आहे.


मचअवेटेड लग्न 

फेसबुकवर दीपिका आणि रणवीरची फॅन फॉलोविंग जास्त असल्याने विराट आणि अनुष्कापेक्षा दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा फेसबुकवर अधिक झाली. आता लवकरच प्रियंका-नीकचं लग्न होणार आहे. हे मचअवेटेड लग्न गेमचेंजर ठरू शकतं असंही कौल यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा - 

'झिरो' विरोधातील याचिकेवर ३० नोव्हेंबरला सुनावणी

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा