SHARE

इतरांप्रमाणे आपल्यालाही कधीतरी बाॅलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराला वाटत असतं. काहींचं हे स्वप्न अल्पावधीतच साकार होतं, तर काहींसाठी करियरच्या उत्तरार्धातही बॅालीवूडचं दार खुलं होत नाही. अभिनेत्री भाग्यश्री मोटेसाठी मात्र करियरच्या सुरुवातीच्या काळातच ही नामी संधी चालून आली आहे.


काय रे रास्कलातून पदार्पण 

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेल्या 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी भाग्यश्री सध्या खूपच बीझी आहे. मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या भाग्यश्रीकडे सध्या बरेच चित्रपट असून, लवकरच ती एका बॉलीवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याचं समजतं. 


सलग तीन चित्रपट

ट्राय अँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन हार्दिक गज्जर करणार असून, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, हिंदीत नशीब अजमावणाऱ्या मराठी तारकांच्या यादीत आता भाग्यश्रीचाही लवकरच समावेश होणार आहे. पुढील वर्षाप्रमाणे यंदाचं वर्षदेखील तिच्यासाठी खूप खास आहे. यावर्षी तिचे सलग तीन मराठी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यापैकी 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियकर' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले असून, लवकरच तिचा 'विठ्ठल' हा चित्रपटही या वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार आहे. यात ती एका विशिष्ट भूमिकेत दिसेल.


बॉलीवूड एंट्री 

गोंडस आणि गोजिऱ्या चेहऱ्याच्या भाग्यश्रीने आपल्या अभिनयाद्वारे मराठी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडण्यास यश मिळवले आहे. त्यामुळे आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास ती सज्ज झाली असून, मराठमोळ्या भाग्यश्रीची बॉलीवूड एंट्री पाहण्यासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित !हेही वाचा - 

पाहा, रीचाचा सिल्की लूक!

डायलॅागबाज प्रथमेशची बॉलीवूड हॅट्रिक!
संबंधित विषय
ताज्या बातम्या