Advertisement

डायलॅागबाज प्रथमेशची बॉलीवूड हॅट्रिक!

'खाना खा लो वरना गोली खान पडेगा...', 'काम क्या है बता...' हे प्रथमेशचे डायलॉग्स त्याच्या चाहत्यांना विशेष आवडणारे आहेत. कोणतीही व्यक्तीरेखा सहज पण उत्तम साकारुन प्रेक्षकांकडून दाद मिळवण्यात नेहमीच यशस्वी ठरणारा प्रथमेश त्याच्या या हिंदी सिनेमामुळे चर्चेचा विषय बनणार यात शंका नाही.

डायलॅागबाज प्रथमेशची बॉलीवूड हॅट्रिक!
SHARES

अजय देवगणसोबतच्या 'दृश्यम' आणि हर्ष छाया दिग्दर्शित 'खजूर पे अटके' या दोन हिंदी चित्रपटांनंतर अभिनेता प्रथमेश परब बॅालीवूडमध्ये चित्रपटांची हॅट्ट्रीक करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अन्य - द अदर' या आगामी हिंदी चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.


पॉलिटीकल-रोमँटिक थ्रिलर

अन्य गोष्टींना जरा थोडा वेळ बाजूला ठेवा आणि 'अन्य'ला पाहा, अशी म्हणायची वेळ आता आली आहे. कारण महाराष्ट्राचा वंडरबॉय असलेल्या प्रथमेश परबच्या आगामी हिंदी सिनेमा 'अन्य'चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिम्मी लिखित आणि दिग्दर्शित 'अन्य' हा प्रथमेशचा तिसरा बॉलीवूड सिनेमा आहे. पॉलिटीकल-रोमँटिक थ्रिलर असणाऱ्या या चित्रपटात प्रथमेश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 


लक्षवेधी डायलॅाग 

अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधान, गोविंद नामदेव, तेजश्री प्रधान आणि कृतिका देव या कलाकारांसोबत प्रथमेश स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाच्या टीझरने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं असून, यात प्रथमेशच्या डायलॉगबाजीचा मोलाचा वाटा आहे. डायलॅागबाजीत प्रथमेश नेहमीच सरस ठरला आहे. यापूर्वी 'टाइमपास'मधील त्याची डायलॅागबाजीही प्रेक्षकांना खूप भावली होती.  'अन्य' या चित्रपटातही त्याचे असेच काहीसे लक्षवेधी डायलॅाग ऐकायला मिळणार आहेत. त्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते.


काम क्या है बता

'खाना खा लो वरना गोली खान पडेगा...', 'काम क्या है बता...' हे प्रथमेशचे डायलॉग्स त्याच्या चाहत्यांना विशेष आवडणारे आहेत. कोणतीही व्यक्तीरेखा सहज पण उत्तम साकारुन प्रेक्षकांकडून दाद मिळवण्यात नेहमीच यशस्वी ठरणारा प्रथमेश त्याच्या या हिंदी सिनेमामुळे चर्चेचा विषय बनणार यात शंका नाही. नवीन वर्षाची सुरुवात बॉलीवूडने करणाऱ्या प्रथमेशचा 'अन्य' मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


टीझर लिंक -  http://bit.ly/AnyaTeaserOut 



हेही वाचा - 

राहुल महाजन तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत!

दीपिका-रणवीरपेक्षा अनुष्का-विराटचा लग्नसोहळा सर्वाधिक लोकप्रिय!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा