दोन अयशस्वी लग्नाचा अनुभव घेतल्यानंतर भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. कझाकिस्तानची मॉडेल नटाल्या इलिना हिच्यासोबत राहुलने तिसरं लग्न केलं आहे.
मुंबईतील मलबार हिल इथल्या एका मंदिरात हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झालं. या लग्नाला केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. एका काॅमन फ्रेंडमुळे राहुल आणि नटाल्या यांची एकमेकांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दीड वर्षे ते रिलेशनशीपमध्ये होते. गेल्या महिन्यात राहुलने तिला लग्नाची मागणी घातली.
''माझे आधीची दोन्ही लग्न खूप घाईत झाली होती. डिम्पी आणि श्वेता माणूस म्हणून चांगल्या होत्या. पण मागील काही दिवसांपासून मला खूप एकटं वाटत होतं. नटाल्याशी ओळख झाल्यावर ती माझी जोडीदार होऊ शकते, असं मला मनापासून वाटलं,'' अशी प्रतिक्रिया राहुलने लग्नानंतर दिली.
एका रियॅलिटी शोच्या माध्यमातून राहुलचं पहिलं लग्न पायलट श्वेता सिंग हिच्याशी झालं होतं. मात्र, परस्परांतील मतभेदांमुळे हे लग्न टिकलं नाही. त्यानंतर राहुलने डिम्पी गांगुली हिच्याशी दुसरं लग्न केलं. परंतु काही वर्षांनी हे लग्न देखील मोडलं. त्यानंतर आता राहुलने नटाल्यासोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
हेही वाचा-
दीपिका-रणवीरपेक्षा अनुष्का-विराटचा लग्नसोहळा सर्वाधिक लोकप्रिय!
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी