Advertisement

अभिनेता मनोज बाजपेयीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

मनोज बाजपेयी त्याच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्याचवेळी त्याला कोरोनाची लागण झाली.

अभिनेता मनोज बाजपेयीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
SHARES

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि निर्माता-दिग्दर्शत संजय लीला भन्साळी यांच्यानंतर मनोज बाजपेयीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बाजपेयींनं स्वत:ला घरीच क्वारंटाईन केलं आहे.

मनोज बाजपेयी त्याच्या एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्याचवेळी त्याला कोरोनाची लागण झाली. त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

भिनेता चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर मनोज बाजपेयीनं कोरोना चाचणी केली होती. त्यात त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. चित्रपटाचं शूटिंग काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. या क्षणी, अभिनेता ठीक आहे. त्यानं घरी स्वत: क्वारंटाईन केलं आहे आणि अत्यंत काळजी घेत आहे.

मनोज बाजपेयी लवकरच फॅमिली मॅन 2 मध्ये दिसणार आहेत. ही मालिका प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. त्याचे शूटिंगही पूर्ण झालं आहे. या दिवसांत मनोज त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगवर होता जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालं होतं. भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचं आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचं शूटिंग थांबलं आहे. रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांनी अशी माहिती दिली की, रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे.

रणबीर कपूरचा फोटो शेअर करत नीतू सिंग यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, 'तुमच्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. रणबीरची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो त्याची औषधे घेत आहे आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.'

दुसरीकडे निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं. संपूर्ण युनिटची पुन्हा कोरोना चाचणी सुरू आहे. चित्रपटाची नायिका आलिया भट्टचीही चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल नकारात्मक आला आहे.



हेही वाचा

'दृष्टांत'मध्ये सर्व दृष्टिहीन कलाकार

‘बळी’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा