Advertisement

सिद्धार्थ, रितेशसोबत तारा म्हणतेय ‘मरजावां’


सिद्धार्थ, रितेशसोबत तारा म्हणतेय ‘मरजावां’
SHARES

‘एक व्हिलन’ या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या अभिनयाची निगेटिव्ह-पॅाझिटिव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. यानंतर ‘मरजावां’ असं म्हणत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आहे अभिनेत्री तारा सुतारीया.


'ही' अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत

‘सत्यमेव जयते’नंतर भूषण कुमार, निखील अडवाणी आणि मिलाप झवेरी आपल्या आगामी चित्रपटाकडे वळले आहेत. या चित्रपटाचं शीर्षक आहे ‘मरजावां’. हा अॅक्शनपॅक्ड हाय ड्रामा असून यात एक इमोशनल लव्हस्टोरीही गुंफण्यात आल्याचं समजतं. मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटात रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या जोडीला तारा सुतारीया मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बॅालिवूडमध्ये खूप उत्सुकतेचं वातावरण होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रितेश-सिद्धार्थ एकत्र आले आहेत.


'एक व्हिलन'नंतर दोघे पुन्हा एकत्र

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या, तसंच मिलाप यांचंच लेखन सहाय्य असलेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटात सर्वप्रथम हे दोघे एकत्र दिसले होते. तर तारा सुतारीयाचा अप्रदर्शित ‘सॅाटी २’ हा पदार्पणाचा चित्रपट आहे. त्यामुळे ‘मरजावां’मध्ये सिद्धार्थ-रितेशसोबत प्रेक्षकांना एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे.


कधी येणार सिनेमा?

टी-सीरीजचे सीएमडी भूषण कुमार यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा निखिलसारख्या पार्टनरसोबत चित्रपट बनवताना उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांना एक फॅमिली एंटरटेनर देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मिलाफसोबत काम करत आहोत. स्टोरीलाइन पाहता ‘मरजावां’ या चित्रपटात सुंदररीत्या गुंफलेली म्युझिकल लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी आशाही भूषण यांनी व्यक्त केली आहे.

या वर्षी डिसेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असून, पुढल्या वर्षी २ आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा