Advertisement

पालिकेच्या नोटीसविरोधात अभिनेता सोनू सूदची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

पालिकेच्या नोटीसविरोधात अभिनेता सोनू सूदची सर्वोच्च न्यायालयात धाव
SHARES

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं आपल्या संपत्तीवर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

यापूर्वी अवैध बांधकाम प्रकरणात सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे. न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं सोनू सूद यांनी याचिका फेटाळून लावली होती.

सोनूनं आपल्या एसएलपीमध्ये म्हटलंय की, ना ही आपण सवयीचा गुलाम आहे आणि नाही कायदा किंवा नियमांबाहेर काही बदल केला आहे. आपण हॉटेलच्या अंतर्गत बाबींमध्ये बदल केला आहे.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार अंतर्गत बदलाला कुठल्या मंजुरीची गरज नाही. तरीही २०१८ मध्ये परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पालिकेकडून अद्याप त्या अर्जावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सोनू सूद यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील इमारतीच्या बांधकामात नियमांचं उल्लंघन होत असल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं. त्यावर मुंबई महापालिकेकडून रहिवासी इमारतीचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली होती.

या नोटीसशी संबंधित शर्थींचं पालन करण्यासाठी सोनू सूदच्या वकिलांनी न्यायालयाकडे १० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयानं कायदा हा मेहनती लोकांनाच मदत करतो, असं सांगत याचिका फेटाळून लावली होती.

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू इथल्या सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी पालिकेनं अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेनं जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.



हेही वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली

सत्यमेव जयतेमध्ये जॉन अब्राहिम साकारणार दुहेरी भूमिका

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा