Advertisement

सत्यमेव जयतेमध्ये जॉन अब्राहिम साकारणार दुहेरी भूमिका

'सत्यमेव जयते २' मध्ये जॉन अब्राहमची दुहेरी भूमिका आहे.

सत्यमेव जयतेमध्ये जॉन अब्राहिम साकारणार दुहेरी भूमिका
SHARES

'सत्यमेव जयते २' मध्ये जॉन अब्राहमची दुहेरी भूमिका आहे. एका भूमिकेत तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसणार आहे. त्याचवेळी, दुसर्‍या भूमिकेत तो शत्रूंचा नायनाट करताना दिसणार आहे.

अशा प्रकारे जॉन सत्याग्रह आणि हिंसा या दोन्ही द्वारे भ्रष्टाचा-यांना धडा शिकवणार आहे. चित्रपटात जॉनचा अ‍ॅक्शन अवतार बघायला मिळणार आहे.

जॉननं या चित्रपटासाठी लीन फिजिक ठेवलं आहे. यासाठी त्यानं त्याचं वजन १० ते १२ किलोपर्यंत कमी केलं आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉननं ट्रकचा टायर फाडला होता. तर आता दुस-या भागात तो ट्रक आणि ट्रॅक्टरसोबत अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात तो ५० गुंडांसोबत एकटा लढताना दिसेल.

क्लायमॅक्सच्या अ‍ॅक्शन सीन्सची लांबी वाढविली गेली आहे. याचं शूटिंग मागील पंधरवड्यापासून मुंबईत सुरू आहे आणि २१ जानेवारीला ते पूर्ण होईल. लखनौ शेड्यूलमध्ये बरेच अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट करण्यात आले आहेत. विशेषत: मलिहाबादच्या शेतात अ‍ॅक्शन सीन्सची शूटिंग करण्यात आले आहेत.संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा