Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली

अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सोनू सूदविरोधात ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली
SHARES

अवैध बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात सोनू सूदने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. 

अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सोनू सूदविरोधात ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम 53 नुसार ऑक्टोबर 2020 मध्ये सोनू सूदला नोटीस दिली होती. मुंबई महापालिकेनं सोनू सूद सातत्यानं रहिवासी इमारतीचं रुपांतर हॉटेलमध्ये करत असल्याचा दावा केला होता.

तर या इमारतीत कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा दावा करत सोनू सूदने अॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पालिकेच्या सर्व आरोपांचे सोनू सूदने खंडन केले आहे. इमारतमधील बदलासाठी आपण बीएमसीकडून यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजूरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे सध्या मी कामही थांबवलेले आहे, असे सोनू सूदने स्पष्ट केलं होतं. 

या प्रकरणावर गुरूवारी सुनावणी झाली.यावेळी उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळून लावली. सुनावणीत महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे.हेही वाचा -

महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

लसीकरणासाठी महापालिकेनं दिली 'ही' सवलतRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा