‘उरी’च्या सेटवर विकी दुखापतग्रस्त

यात विकीचा उजवा हात दुखावला आहे. ‘उरी’मधील डेअरडेव्हिल अक्शन दृश्यांसाठी विकी खूप मेहनत घेत आहे. त्याचाच सराव करताना अचानक विकीला वेदना सुरू झाल्या आणि त्याचा हात सुजला.

SHARE

मागील काही दिवसांपासून ‘उरी’ या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला अभिनेता विकी कौशलला या सिनेमाच्या सेटवर दुखापत झाली आहे.


कुठे झाली दुखापत?

२९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित असलेल्या ‘उरी’ या सिनेमात विकी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या सर्बियामध्ये सुरू आहे. चित्रीकरणादरम्यान अॅक्शन सीन्स करताना विकीला दुखापत झाली.


हाताला सूज

यात विकीचा उजवा हात दुखावला आहे. ‘उरी’मधील डेअरडेव्हिल अक्शन दृश्यांसाठी विकी खूप मेहनत घेत आहे. त्याचाच सराव करताना अचानक विकीला वेदना सुरू झाल्या आणि त्याचा हात सुजला. त्यानंतर सर्बियामधील रुग्णालयात विकीवर उपचार करण्यात आले. त्याच्या मांसपेशीत सूज आल्याचं डाक्टरांचं म्हणणं असून, पुढील आठवड्यापासून तो सेटवर परतणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राजकुमार हिरानींच्या ‘संजू’ या सिनेमात एका वेगळ्याच रूपात दिसलेल्या ‘मसान’ फेम विकीचं सर्वांनीच त्याचं कौतुक केलं होतं. रानी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेल्या ‘उरी’मध्ये विकीसोबत यामी गौतम, परेश रावल, किर्ती कुल्हारी आणि मोहित रैना यांच्याही भूमिका आहेत.हेही वाचा-

नीरज पांडेंच्या सिनेमासाठी अजय बनला ‘चाणक्य’

'दबंग ३'मध्ये झळकणार महेश मांजरेकरांची कन्या अश्वमी?संबंधित विषय
ताज्या बातम्या