Advertisement

कार्तिकसोबत हिमाचल प्रदेशात काय करतेय सारा?

अभिनेत्री सारा अली खानचा पदार्पणातील 'केदारनाथ' बॅाक्स आॅफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी त्यानंतर आलेल्या 'सिंबा'नं जबरदस्त कमाई केल्यानं साराच्या करियरची गाडी चांगलीच धावू लागली आहे. सारा सध्या हिमाचल प्रदेशमध्ये कार्तिक आर्यनसोबत आहे.

कार्तिकसोबत हिमाचल प्रदेशात काय करतेय सारा?
SHARES

अभिनेत्री सारा अली खानचा पदार्पणातील 'केदारनाथ' बॅाक्स आॅफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी त्यानंतर आलेल्या 'सिंबा'नं जबरदस्त कमाई केल्यानं साराच्या करियरची गाडी चांगलीच धावू लागली आहे. सारा सध्या हिमाचल प्रदेशमध्ये कार्तिक आर्यनसोबत आहे.

हे वेगळं प्रकरण

कार्तिक आर्यन हे नाव उच्चारताच अलिकडेच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या काही नवोदित अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलेला अभिनेता असं काहीसं समीकरण डोळ्यांसमोर येतं. सारा अली खान हे नावही त्यात मागं नाही. त्यामुळंच सारा, कार्तिक आणि हिमाचल प्रदेश असं म्हटल्यावर काहींना हे वेगळं प्रकरण वाटण्याची शक्यत आहे, पण तसं काही नाही. सारा आणि कार्तिक सध्या हिमाचल प्रदेश मुक्कामी असले तरी ते कोणत्याही खासगी कामानिमित्त नसून, आपल्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शूटसाठी आहेत.

निसर्गसौंदर्याचा आनंद

पदार्पणातच केदारनाथसारख्या नयनरम्य ठिकाणी शूट करणारी सारा सध्या हिमाचल प्रदेशमधील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहे. सारा आणि कार्तिक यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालेलं नाही, पण या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक-सारा या जोडीसह नयनरम्य वातावरणात बसलेले इम्तियाज अली, रणदीप हुड्डा आणि इम्तियाज यांच्यात चित्रपटातील दृश्यावर सुरू असलेली चर्चा आणि हिमाचल प्रदेशमध्ये शूटसाठी गेलेल्या संपूर्ण टीमच्या फोटोचा समावेश आहे.

६६ दिवसांचं शूटिंग

या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाज अली करत असून, हिमाचल प्रदेशमधील शूट पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं ६६ दिवसांचं शूटिंग शेड्युल हिमाचल प्रदेशसह मुंबई, दिल्ली आणि उदयपूर येथे पूर्ण करण्यात आलं आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यात सारा, कार्तिकच्या जोडीला रणदीप हुड्डाही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सध्या एकाच वेळी बऱ्याच चित्रपटांच्या निर्मितीत व्यग्र असलेल्या निर्माते दिनेश विजान यांच्या मॅडॅाक फिल्म्ससह जिओ स्टुडिओज इम्पियाज अली आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा

भाजप-शिवसनेनं करून नाही, तर भरून दाखवलं- विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा