Advertisement

पहा, शमिताचं फुकेटमधील बर्थडे सेलिब्रेशन!

त. अभिनेत्री शमिता शेट्टीने नुकताच आपला बर्थडे फुकेटमधील नयनरम्य ठिकाणी साजरा केला.

पहा, शमिताचं फुकेटमधील बर्थडे सेलिब्रेशन!
SHARES

सेलिब्रिटीज आणि त्यांच्या वाढदिवसांचं चाहत्यांना भलतंच आकर्षण असतं. त्यामुळेच काही चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात. काही कलाकार मात्र या सर्वांपासून दूर जात आपल्या जीवलग मित्र-मैत्रीणींसोबत बर्थडे एन्जॅाय करतात आणि त्याचे फोटो थेट सोशल मीडियावर शेअर करतात. अभिनेत्री शमिता शेट्टीने नुकताच आपला बर्थडे फुकेटमधील नयनरम्य ठिकाणी साजरा केला. त्याचीच ही झलक...

शमिताने बहिण शिल्पा शेट्टीसोबत आपला वाढदिवस साजरा केला. या दोघींसोबत राजीव दातिया, किरण बावा, रोहित अय्यर, आकांक्षा मल्होत्रा, गौरी मल्होत्रा नारंग आणि सरीता माधवन हे त्यांचं फ्रेंड सर्कलही होतं. या तीन दिवसांच्या बर्थ डे वीकेंडचं आयोजन शिल्पाचे पती राज कुंद्रा यांनी स्वत: पुढाकार घेऊन फुकेटमध्ये केलं होतं. 

बर्थ डे आणि पार्ट्यांचं आयोजन करण्यात राज कुंद्रा यांचा हातखंडा असल्याचं मानलं जातं. काही वर्षांपूर्वी त्यांनी शिल्पाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठीही असंच भव्य दिव्य आयोजन केलं होतं. आपल्या ३० जिवलग मित्रांसह त्यांनी १५ व्या शतकातील आयलँडच्या दिशेने उड्डाण केलं होतं. तिथेच त्यांनी अनोख्या शैलीत शिल्पाचा वाढदिवस साजरा केला होता. असंच काहीसं प्लॅनिंग त्यांनी यावेळी शमितासाठी केलं होतं.

या अनोख्या आयोजनामुळे शमिता भलतीच खूश आहे. तिच्या जोडीला शिल्पाही खूप आनंदी आहे. या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा मित्र-मैत्रीणींसोबत एन्जॅाय करता आलं. फुकेटमधील एका आलिशान व्हिलामध्ये सर्वांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. तिथून दिसणारं समुद्राचं विहंगम दृश्य मन मोहून टाकणारं होतं. 'बिग बॅास' आणि 'खतरों के खिलाडी'सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शमितासाठी हा एक अॅडव्हेंचर्स अनुभव ठरल्याचं म्हणायला हरकत नाही.हेही वाचा -

मराठमोळ्या सावनीचं तमिळभाषी व्हॅलेंटाईन गिफ्ट !

स्वराली जाधवच्या सूरांना लाभला राजगायिकेचा मान!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा