Advertisement

मराठमोळ्या सावनीचं तमिळभाषी व्हॅलेंटाईन गिफ्ट !

सावनी रविंद्रने सुमधूर गायकीच्या बळावर भारतीय संगीतक्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फिल्मी गीतांसोबतच सावनीच्या नॅान फिल्मी गाण्यांनीही रसिकांना वेड लावलं आहे. आता हीच सावनी संगीतप्रेमींसाठी रोमँटिक व्हॅलेंटाईन गिफ्ट घेऊन आली आहे.

मराठमोळ्या सावनीचं तमिळभाषी व्हॅलेंटाईन गिफ्ट !
SHARES

सावनी रविंद्रने सुमधूर गायकीच्या बळावर भारतीय संगीतक्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फिल्मी गीतांसोबतच सावनीच्या नॅान फिल्मी गाण्यांनीही रसिकांना वेड लावलं आहे. आता हीच सावनी संगीतप्रेमींसाठी रोमँटिक व्हॅलेंटाईन गिफ्ट घेऊन आली आहे.रोमँटिक गीताची भेट

फेब्रुवारीमधील १४ तारखेला व्हॅलेंटाइन डे असल्याने या गुलाबी महिन्यात बरेच रोमँटिक सिनेमे आणि गाणी रिलीज होत असतात. याच पार्श्वभूमीवर सावनीनेही आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. सावनीने एक तमिळ रोमँटिक गाणं गायलं आहे. 'नान सोल्लव्वा...' असा मुखडा असलेलं तमिळ गीत सावनीने गायलं आहे. 'नान सोल्लव्वा...' या तमिळ शब्दांचा अर्थ 'तुला एक सांगू का' असा आहे.सावनी ओरिजनल्स

गीतकार सतिशकांत यांनी लिहिलेल्या या गीताला शुभंकर शेंबेकरने संगीत दिलं आहे. याशिवाय शुभंकरने सावनीसोबत हे गाणं गायलंही आहे. 'सावनी ओरिजनल्स' सीरिजमधलं हे पहिलं गाणं आहे. त्यामुळे भविष्यात या सिरीजमधील आणखी वेगवेगळ्या मूड्समधील गाणी रसिकांच्या भेटीला येणार यात शंका नाही. सावनीसाठी तमिळ भाषेत गायन करणं ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी तिने तमिळ भाषी सिनेमांसाठी बरीच गाणी गायली आहेत.


चित्रीकरण गाण्याला साजेसं

'ईमाई', 'कुटाल' या गाजलेल्या तमिळ सिनेमांसाठी सावनीने गायन केलं आहे. 'वेनिलाविन सलाईगल्ली...', 'कत्रिल इधगळ...', 'उईरे उईरे...' हे तिचे सिंगल्ससुध्दा प्रसिध्द आहेत. 'नान सोल्लव्वा...' विषयी सावनी म्हणाली की, दक्षिणेमध्ये माझे बरेच चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून तमिळ भाषी चाहत्यांकडून सतत मला एखादं ओरिजनल साँग गाण्याची फर्माइश होत होती. त्यांची इच्छा मी या रोमँटिक गाण्याद्वारे पूर्ण केली आहे. या गाण्याचं संगीत नियोजन चेन्नईमधल्या म्युझिशियननं केल्यानं गाणं अस्सल तमिळ मातीतलं वाटतं. चित्रीकरणही गाण्याला साजेसं आहे. तमिळ आणि मराठी कानसेनांच्या गाण्यांविषयीच्या आवडींमध्ये साम्य असतं असं मला वाटतं. त्यामुळे हे गीत मराठी रसिकांनाही आवडेल असा मला विश्वास आहे.


वेगवेगळ्या भाषांमध्ये

सावनी ओरिजनल्सविषयी सावनी रविंद्र म्हणाली की, सूरांना भाषेचं बंधन नसतं. सावनी अनप्लग्डला रसिकांनी खूप छान प्रतिसाद दिला होता. तो पाहून यंदा मी ओरिजनल गाणी घेऊन येण्याचा संकल्प केला आहे. तमिळ भाषेप्रमाणेच बंगाली, पंजाबी, नेपाळी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सावनी ओरिजनल्स घेऊन येण्याचा मानस आहे.हेही वाचा -

स्वराली जाधवच्या सूरांना लाभला राजगायिकेचा मान!

शिक्षणासाठी यंदा २ हजार ७३३ कोटींची तरतूदसंबंधित विषय
Advertisement