Advertisement

स्वराली जाधवच्या सूरांना लाभला राजगायिकेचा मान!

स्वरालीला कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल नासा युएसए टूर - ज्यामध्ये युनिवर्सल स्टुडीओज आणि डिझनीलँड सोबत मनोरंजन आणि अॅडव्हेंचर थीम पार्क पाहण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे.

स्वराली जाधवच्या सूरांना लाभला राजगायिकेचा मान!
SHARES

छोट्या पडद्यावरील 'सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' या रिअॅलिटी शो ची मागील बऱ्याच दिवसांपासून खूप चर्चा होती. त्यामुळे या शोच्या अंतिम फेरीत कोणता बालगायक छोटा सूरवीर ठरतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. नुकतीच या शो ची अंतिम फेरी पार पडली. ज्यात स्वराली जाधवने बाजी मारत राजगायिका बनण्याचा मान मिळवला आहे.


अंतिम सहा शिलेदार

काही वर्षांपूवी 'सारेगम - लिटील चॅम्प्स' या शो ने जशी जादू केली होती, तशी जादू कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमामधील छोट्या सुरवीरांनी केली. तब्बल सहा महिने त्यांच्या निखळ, निरागस स्वरांनी अवघ्या महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवलं. सहा महिन्यांपूर्वी २१ छोट्या सुरवीरांसोबत सुरू झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरंच काही शिकायला मिळालं आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाला मिळाले स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे आणि अंशिका चोणकर हे अंतिम सहा शिलेदार. 


सुवर्ण कट्यार 

या अंतिम सहा स्पर्धकांमध्ये रंगला सुवर्ण कट्यार मिळवण्यासाठी सुरांचा महासंग्राम. महाअंतिम सोहळ्यामध्ये स्पर्धकांमध्ये रंगली गाण्यांची मैफल आणि स्वराली जाधवच्या रूपात महाराष्ट्राला मिळाली नवीन छोटी सुरवीर. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते स्वरालीला सुवर्ण कट्यार देऊन तिला 'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' कार्यक्रमाची राजगायिका म्हणून घोषित करण्यात आलं. 


विशेष भेट 

स्वरालीला कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल नासा युएसए टूर - ज्यामध्ये युनिवर्सल स्टुडीओज आणि डिझनीलँड सोबत मनोरंजन आणि अॅडव्हेंचर थीम पार्क पाहण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाच छोट्या सुरवीरांसोबत मॉनिटरलाही कलर्स मराठीतर्फे एक लाखाचा धनादेश आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल हिमाचल प्रदेशचा दौरा ही विशेष भेट मिळाली आहे.


पोवाड्याने रंगत वाढवली

महाअंतिम सोहळ्यामध्ये शाल्मली खोलगडे, अवधूत गुप्ते आणि विशेषतः महेश काळे यांनी सहा छोट्या सुरवीरांसोबत सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थितांना पुन्हा एकदा भारावून टाकलं. मॉनिटर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रम रंगतदार बनवण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील लाडके कलाकारही महाअंतिम फेरीसाठी उपस्थित होते. या सोहळ्यात उत्कर्षने 'हे सुरांनो...', सईने 'दिलबर दिलसे प्यारे...', मीराने 'मेरा कूछ सामान...', चैतन्यने 'मल्हारी...' तर अंशिका आणि स्वरालीने अनुक्रमे 'इंतहा हो गई...', 'दमा दम...' ही गाणी सादर केली.



हेही वाचा - 

दादा कोंडकेंची आॅनस्क्रीन आई बनली वैभवची आजी!

रीअल आणि रीलमधील डॉ. आनंदीबाई जोशी समोरासमोर!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा