Advertisement

रीअल आणि रीलमधील डॉ. आनंदीबाई जोशी समोरासमोर!

अलीकडच्या काळात बायोपीकचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपल्या असामान्य कतृत्वाने इतिहास रचणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर अवतरत आजच्या पिढीसाठी प्रेरणा देत आहेत. अशातच भारतातील पहिल्या महिला डॅाक्टर असा नावलौकीक असलेल्या डाॅ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित असलेला 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

रीअल आणि रीलमधील डॉ. आनंदीबाई जोशी समोरासमोर!
SHARES

अलीकडच्या काळात बायोपीकचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपल्या असामान्य कतृत्वाने इतिहास रचणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर अवतरत आजच्या पिढीसाठी प्रेरणा देत आहेत. अशातच भारतातील पहिल्या महिला डॅाक्टर असा नावलौकीक असलेल्या डाॅ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित असलेला 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 'आनंदी गोपाळ'च्या टिमने आनंदीबाईंच्या वास्तव्यस्थानी जाऊन त्यांना मानवंदना दिली.


दुहेरी ऐतिहासीक वारसा

भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म पुण्यात झाला होता. ज्या वास्तूमध्ये आनंदीबाई यांचा जन्म आणि मृत्यू झाला त्याच वास्तूमध्ये पुणे भारत गायन समाज ही पुण्याच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्वपूर्ण संस्था कार्यरत आहे. आज शास्त्रीय संगीतासाठी वाहून घेतलेल्या या वास्तूला दिग्गज संगीतकर्मींचा सहवास आणि आनंदीबाईचं वास्तव्य असा दुहेरी ऐतिहासीक वारसा लाभला आहे. या स्थळाला भेट देण्यासाठी 'आनंदी गोपाळ'च्या टिममधील मुख्य कलाकारांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला आणि रीअल व रील लाईफमधील आनंदीबाई समोरासमोर आल्या.



प्रेरणादायी संघर्ष

सामाजिक, आर्थिक परिस्थितीशी झगडत गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविलं. आनंदीबाईंनी अमेरिकेतून एम.डी. ही वैद्यकीय सेवेतील मोठी पदवी मिळवली. त्यांच्या असामान्य कामगिरीची दखल घेत इंग्लंडची राणी व्हिक्टोरीया यांनी आनंदीबाईंचं कौतुक केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्या काळात स्त्री शिक्षण हे पाप मानलं जायचं, त्या काळात डॉक्टरी पेशासारखं उच्चशिक्षण घेणाऱ्या आनंदीबाईंचा प्रवास आणि गोपाळरावांचा संघर्ष हा आजही प्रेरणादायी ठरणारा आहे.


वास्तूला भेट

आनंदीबाईंचा हाच संघर्षमय प्रवास 'आनंदी गोपाळ' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.'आनंदी गोपाळ'च्या टीमने या वास्तूला भेट दिली, या प्रसंगी पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा ज्येष्ठ गायिका शैला दातार, चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस, अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद, झी स्टुडीओचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.



हेही वाचा -

'भाई'मधील पुलंसाठी तिरुपतीहून आले केस!

जीएसबी मंडळ उभारणार सुसज्ज रुग्णालय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा