Advertisement

'भाई'मधील पुलंसाठी तिरुपतीहून आले केस!

रंगभूषा आणि वेशभूषा हा सिनेमा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा अविभाज्य भाग असतो. एखाद्या कलाकाराला अमूक एका व्यक्तिरेखेसारखं भासवण्यात मेकअप आणि गेटअपचा खूप मोठा वाटा असतो. 'भाई - व्यक्ती की वल्ली' या सिनेमाच्या पूर्वार्धात सागर देशमुखने, तर उत्तरार्धात विजय केंकरे यांनी पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.

'भाई'मधील पुलंसाठी तिरुपतीहून आले केस!
SHARES

रंगभूषा आणि वेशभूषा हा सिनेमा आणि त्यातील व्यक्तिरेखांचा अविभाज्य भाग असतो. एखाद्या कलाकाराला अमूक एका व्यक्तिरेखेसारखं भासवण्यात मेकअप आणि गेटअपचा खूप मोठा वाटा असतो. 'भाई - व्यक्ती की वल्ली' या सिनेमाच्या पूर्वार्धात सागर देशमुखने, तर उत्तरार्धात विजय केंकरे यांनी पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. यातील कलाकारांना पुलंच्या रूपात आणण्यासाठी तिरुपतीहून केस मागवण्यात आले होते.


साळवी ब्रदर्सचं योगदान

'भाई - व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाचा उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटातला पुलं साकारलेल्या सागर देशमुखचा 'साठ्ठोत्तरी' भाईंचा लूक रसिकांना आवडत आहे. भाईंचा हा लूक हुबेहूब वाटण्यामध्ये साळवी ब्रदर्स यांचं खूप मोठं योगदान आहे. सुरेंद्र आणि जितेंद्र साळवी या दोन बंधूंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. भाईंचे तरूणपणापासून ते म्हातरपणापर्यंतचे विग्स 'नॅचरल हेअर स्टुडियो'ने बनवले आहेत.विगसाठी वीस दिवस

याबाबत नॅचरल हेअर स्टुडियोचे जितेंद्र साळवी म्हणाले की, भाईंच्या तरूणपणीच्या विगपेक्षा त्यांच्या म्हातरपणाचा विग जास्त कठीण होता. तरूणपणीचा विग आठ दिवसांमध्ये तयार झाला. पण म्हातरपणीचा विग बनवायला वीस दिवस लागले. सर्वसाधारणपणे म्हातारपणी केस विरळ होत जातात. केसांची मुळंही दिसू लागतात. त्यात भाईंचे म्हातारपणीचे फोटो तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की, त्यांचे केस कुरळे असणंही आवश्यक होतं. भाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं कपाळ मोठं करण्यासाठी पुढचे केसही आम्हाला काढावे लागले. त्यांच्या म्हातरपणीचा लूक डिझाइन करण्यासाठी तिरूपतीवरून केस मागवून एक-एक केसांचा विग बनवला.९५ टक्के सिनेमांसाठी वीग

मागील ३८ वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या सुरेंद्र आणि १६ वर्ष काम करणाऱ्या जीतेंद्र यांचा नॅचरल हेअर स्टुडियो बॉलीवूडमधील जवळ-जवळ ९५ टक्के सिनेमांसाठी वीग डिझाइन करतो. जानेवारी महिन्यात रिलीज झालेल्या 'भाई', 'उरी', 'ठाकरे' या मोठ्या सिनेमांसाठी त्यांनी विग डिझाइन केले आहेत. 'ठाकरे'साठी नवाजुद्दिन सिद्दिकीचा लूक डिझाइन करणं खूप चॅलेंजिंग होतं असं जितेंद्र साळवी सांगतात. नवाजुद्दीनचं कपाळ 'व्ही' आकाराचं आहे, तर बाळासाहेब ठाकरे यांचं कपाळ सरळ आणि मोठं होतं. त्यामुळे 'ठाकरे'मधील नवाजुद्दीनचा लूक तयार करताना बॉल्ड कॅप, हेअर पॅसेचा वापर करावा लागला.हेही वाचा -

सलील दाखवणार 'वेडिंगचा शिनेमा'!

एसएससीचं टेन्शन दूर करणार '१० वी'?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा