Advertisement

सलील दाखवणार 'वेडिंगचा शिनेमा'!

गायन, संगीत, छायालेखन, संकलन, नृत्यदिग्दर्शन, लेखन, निर्मिती या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या काही तंत्रज्ञांनी बऱ्याचदा सिनेदिग्दर्शनातही हात आजमावत दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. याच दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवत गायक-संगीतकार सलील कुलकर्णीही दिग्दर्शनाकडे वळला आहे. पदार्पणातच तो प्रेक्षकांना 'वेडिंगचा शिनेमा' दाखवणार आहे.

सलील दाखवणार 'वेडिंगचा शिनेमा'!
SHARES
Advertisement

गायन, संगीत, छायालेखन, संकलन, नृत्यदिग्दर्शन, लेखन, निर्मिती या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या काही तंत्रज्ञांनी बऱ्याचदा सिनेदिग्दर्शनातही हात आजमावत दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. याच दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवत गायक-संगीतकार सलील कुलकर्णीही दिग्दर्शनाकडे वळला आहे. पदार्पणातच तो प्रेक्षकांना 'वेडिंगचा शिनेमा' दाखवणार आहे.


रसिकांवर मोहिनी

सलील कुलकर्णी हे भारतीय संगीतक्षेत्रातील आघाडीच्या संगीतकारांच्या यादीतील लक्षवेधी नाव आहे. मागील जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक अशा नानाविध भूमिकांच्या माध्यमातून संदीपने आपली एक वेगळी ओळख जपली आहे. या जोडीला 'मधली सुट्टी'सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकाराच्या रूपात त्याने रसिकांवर मोहिनी घालण्यातही यश मिळवलं आहे. आता सलील लेखक आणि दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे. त्याच्या पहिल्या सिनेमाचं शीर्षक 'वेडिंगचा शिनेमा' आहे.टीजर प्रदर्शित

सलीलच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीजरमध्ये 'माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं...' हे लग्नाचे बोल ऐकायला मिळतात. काहीशी अनोखी संकल्पना असलेल्या या टीझर आणि शीर्षकामधून सिनेमात एक लग्नसोहळा पाहायला मिळणार याची चाहूल लागते. सलीलसारख्या संगीतातील हुषार संगीतकाराने 'वेडिंगचा शिनेमा'चं दिग्दर्शन केलं असल्याने समुधूर गीत-संगीताची मेजवानी या सिनेमात असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.


१२ एप्रिलला प्रदर्शित

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे असे मराठीतील नामवंत कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. यासोबतच शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवीन जोडीही यात आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचं आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.


कोणती गोष्ट सांगणार?

सलील कुलकर्णी रंगमंचावरून गायला लागला आणि 'चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही...' म्हणत त्याने सर्वांची मनं जिंकली. संगीतकार म्हणून त्याने पस्तीसहून आधिक चित्रपटांची गाणी केली आहेत. 'डीबाडी डीपांग‌...' किंवा 'देही‌ वणवा ‌पिसाटला...'पासून ते 'एकटी एकटी घाबरलीस ना...'पर्यंत त्याची सर्वच गाणी एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवणारी ठरली. 'दमलेल्या बाबाची कहाणी' ऐकून डोळे पाणावले आणि विंदा करंदीकर यांच्या 'एका माकडाने काढले दुकान'पासून 'अग्गोबाई ढग्गोबाई'पर्यंत गाण्यांवर केवळ लहान मुलं हसली आणि नाचली नाहीत तर त्यांच्या पालकांनीही ताल धरला. ज्याच्या बालगीतावर प्रत्येक शाळेत बालगोपाळ रमले तो सलील आता 'वेडिंगचा शिनेमा'मध्ये कोणती गोष्ट सांगणार आहे ते पाहूया.

हेही वाचा -

प्रेयसीच्या मदतीने पत्नी, मुलीचा खून

पश्चिम रेल्वेच्या ११ तासांच्या मेगाब्लॉकवेळी विशेष बससंबंधित विषय
Advertisement