SHARE

धारावीतील डायमंड अपार्टमेंटमधील १० व्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेचा आणि ३ वर्षाच्या मुलीचा गळा चिरून मृतदेह जाळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी गुरुवारी मृत महिलेचा पती इलियाद सय्यद (३८) याला ताब्यात घेतलं. परंतू, तपासावेळी महिलेचा पती गुन्हेगार नसल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र, अधिक तपास केला असता पतीनेचं पत्नी तेहसिन जेहरा इलियाद सय्यद (३४) आणि मुलगी आलीया (२ वर्षे ६ महिने) या दोघांची हत्या केली असून पतीची प्रेयसी आफरिनबानो फय्याज हुसेन सय्यद हिने मृतदेह जाळल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोघांना शाहू नगर पोलिसांनी अटक केली आहे.


वारंवार वाद

इलियाद आणि आफरिनबानो यांचे संबंध तेहसिन समजले होते. त्यामुळं या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून इलियाद आणि त्याची प्रेयसी आफरिनबानो यानी पत्नी आणि मुलीला मारण्याचा कट रचला. त्यानुसार गुरुवारी सकाळी राहत्या घरी इलियाद याने त्याच्या पत्नी आणि मुलीची धारधार शस्त्राने हत्या केली. या हत्येचे पुरावे सापडू नये यासाठी आफरिनबानो हिने त्या दोघांचेही मृतदेह जाळले.


खोलीतून धूर

मृतदेह जाळल्यानंतर त्यांच्या खोलीतून धूर येत असल्याचे पाहून मेहराज हूसेन इन्तजार सय्यद याने शाहू नगर पोलिस ठाण्यात माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास करत शाहू नगर पोलिसांनी शुक्रवारी इलियाद सय्यद आणि आफरिनबानो यांना अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कलम ३०२, २०१ भा.द.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.हेही वाचा -

ट्रायची नवी नियमावली लागू, ग्राहक मात्र अजूनही संभ्रमात

तेलतुंबडेंना मुंबई विमानतळावर अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या