Advertisement

अजय देवगणचे वडील विरु देवगण यांचं निधन

हिंदी चित्रपटसृष्टीत अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर दिग्दर्शक-निर्माते म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांचं सोमवारी सकाळी निधन झालं.

अजय देवगणचे वडील विरु देवगण यांचं निधन
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर दिग्दर्शक-निर्माते म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांचं सोमवारी सकाळी निधन झालं. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. सांताक्रूझ येथील सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. चार मुलं, सूना, नातवंडं असा त्यांचा परिवार आहे.


८० पेक्षा जास्त सिनेमे

 मागील काही दिवसांपासून अजय त्यांच्या प्रकृतीकडं लक्ष देत होता. शूटिंग, प्रमोशान याकडं त्यानं अक्षरश: पाठ फिरवली होती. याच कारणामुळं त्यानं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटासाठी प्रसारमाध्यमांच्या मुलाखतीही रद्द केल्या होत्या. वीरू देवगण हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अँक्शन विश्वातील फार मोठं नाव. जवळजवळ ८० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी वीरू यांनी अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे. यात बऱ्याच गाजलेल्या हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे.


'या' सिनेमांचा समावेश

अॅक्शन दिग्दर्शनासोबतच वीरू यांनी 'हिंदुस्थान की कसम' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं. याखेरीज त्यांनी 'दिल क्या करे' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. वीरू यांच्या अॅक्शननं सजलेल्या चित्रपटांमध्ये 'इश्क', 'लाल बादशहा', 'क्रांती', 'त्रिदेव', 'खतरों के खिलाडी', 'खून भरी मांग', 'सोने पे सुहागा', 'मि. इंडीया', 'आखरी रास्ता', 'राम तेरी गंगा मैली', 'हिम्मतवाला', 'पुकार', 'प्रेम रोग', 'मि. नटवरलाल', 'सत्यम शिवम सुंदरम', 'स्वर्ग से सुंदर', 'फूल और कांटे', 'आग और शोला', 'अंधा कानून', 'खुदगर्ज', 'बाझी', 'खुद्दार', 'आज का अर्जुन', 'हकीकत', 'जान' यांसारख्या बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. 

'क्रांती', 'सौरभ' आणि 'सिंहासन' या ८०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये वीरू यांनी अभिनयही केला होता. 'विश्वात्मा' आणि 'मेरा पती सिर्फ मेरा है' या चित्रपटांसाठी त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'जिगर' या अॅक्शनपटाची लेखन संकल्पना वीरू देवगण यांचीच होती.



हेही वाचा-

ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत होणार - जॉन बेली

मराठी 'बिग बॉस'चा पहिला दिवस...



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा