Advertisement

मराठी 'बिग बॉस'चा पहिला दिवस...

मराठी 'बिग बॉस'चं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर सर्वांनाचा दुसऱ्या पर्वाचे वेध लागले होते. सूत्रसंचालक महेश मांजरेकरांचे विविध गेटअप्समधले प्रोमोज पाहून उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता मराठी 'बिग बॉस २' सुरू झालं आहे.

मराठी 'बिग बॉस'चा पहिला दिवस...
SHARES

मराठी 'बिग बॉस'चं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर सर्वांनाचा दुसऱ्या पर्वाचे वेध लागले होते. सूत्रसंचालक महेश मांजरेकरांचे विविध गेटअप्समधले प्रोमोज पाहून उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता प्रतीक्षा संपली असून, अखेर मराठी 'बिग बॉस २' सुरू झालं आहे.


एका पेक्षा एक परफॉर्मन्स 

मराठी 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा पहिला दिवस म्हणजे कोणकोणते सेलिब्रिटी दिसणार आणि 'बिग बॉस'चं नवं घर कसं असणार याबाबतचं कुतूहल जागवणारा ठरला. अखेर या सगळ्यावरून पडदा उघडला आणि फिल्मसिटीत उभारलेलं 'बिग बॉस'चं नवं घर सर्वांना पहायला मिळालं. महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, सगळ्यांची लाडकी राधा म्हणजेच विणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. 


१४ सदस्य दाखल

किशोरी शहाणे यांची 'बिग बॉस' मराठी सिझन २ च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एक करून १४ सदस्य 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाले. 'बिग बॉस' मराठीचं अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले. 'बिग बॉस'च्या घरामध्ये अभिजित बिचुकले चर्चेत राहिले. मग ते शिवानी सुर्वेवर म्हटलेलं गाणं असो, वा घरामध्ये झालेला वाद असो. 'बिग बॉस'च्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो, शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये घरात एन्ट्री होताच झालेला वाद झाला असो. सारं काही 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनची आठवण करून देणारं ठरलं.हेही वाचा -

ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत होणार - जॉन बेली
संबंधित विषय
Advertisement