ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत होणार - जॉन बेली

जगभरात प्रसिद्ध असलेल्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेस (ऑस्कर अॅवॅार्डस) म्हणजेच ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत स्थापन करण्यात येणार असल्याची गुड न्यूज ऑस्कर अॅकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी दिली आहे.

  • ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत होणार - जॉन बेली
  • ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत होणार - जॉन बेली
SHARE

जगभरात प्रसिद्ध असलेल्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेस (ऑस्कर अॅवॅार्डस) म्हणजेच ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत स्थापन करण्यात येणार असल्याची गुड न्यूज ऑस्कर अॅकॅडमीचे अध्यक्ष जॉन बेली यांनी दिली आहे.


आशियातलं केंद्र

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पत्रकार परिषदेस ऑस्कर अॅवॉर्डसचे अध्यक्ष जॉन बेली, त्यांच्या पत्नी आणि ऑस्कर अॅकॅडमीच्या गर्व्हनर कॅरल लिटलटन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना बेली म्हणाले की, आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच बॉलिवूड नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात प्रथमच आल्यावर अत्यंत आनंद झाला आहे. सध्या ऑस्कर अॅकॅडमीची लंडन आणि युरोप येथे कार्यालयं आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरू केल्यास त्याकडं आशियातलं एक केंद्र म्हणून पाहता येईल. त्यामुळं भारतातून परतल्यानंतर आपल्या ऑस्कर अॅकॅडमीच्या बैठकीत मुंबईतील कार्यालयाबाबत आपण प्रस्ताव ठेवू असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


वर्षभरात १८०० सिनेमे

आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सिनेमांमध्ये भारतीय सिनेमांचं अस्तित्व अधिकाधिक दिसावं याबाबत आपणही आग्रही असल्याचं बेली म्हणाले. आज वर्षभरात भारतात १८०० सिनेमांची निर्मिती होते, ही संख्या हॉलिवूड सिनेमापेक्षा चार पटीनं अधिक आहे. भारतीय सिनेमांची कथा, मांडणी आणि सिनेमा बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेलं तंत्रज्ञान यामुळं आपण प्रभावित आहोत. सध्या अॅकॅडमीच्या विविध विभागात वेगवेगळया ५६ देशांतील ९२८ सदस्य आहेत. भविष्यात ऑस्कर अॅकॅडमीवर भारतातील विविध सिनेमा क्षेत्रांतील दिग्गजांनी सहभाग घ्यावा. जेणेकरुन भारतीय सिनेमा जगभर पोहोचण्यास मदत होईल असं मतही बेली यांनी व्यक्त केलं.


विनोद तावडेंची भेट

पत्रकार परिषदेपूर्वी जॉन बेली आणि कॅरॉल लिटलटन यांनी श्री. तावडे यांची सेवासदन येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. तावडे यांनी ऑस्कर अॅकॅडमीमध्ये बनत असलेल्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा असावा अशी मागणी केली. तसंच ऑस्कर अॅवॉर्डसमध्ये भारतीय चित्रपटसृष्टी अधिकाधिक जोडली जावी अशी मागणी केली. यापूर्वी ऑस्करचे कोणतेही अध्यक्ष कधीच भारतात आले नव्हते. ऑस्करच्या स्थापनेपासून भारतामध्ये येणारे जॉन बेली हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ऑस्कर अध्यक्षांना निमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय गोष्टी त्यांच्या मार्फत जगभरातील सिनेसृष्टीत पोहचविण्याच्या दृष्टीने हा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे.हेही वाचा -

‘माय नेम इज शीला’मध्ये स्मिताचा जलवा
संबंधित विषय
ताज्या बातम्या