Advertisement

‘माय नेम इज शीला’मध्ये स्मिताचा जलवा

सध्या मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावणारी अभिनेत्री स्मिता तांबे आता ‘माय नेम इज शीला’ असं म्हणत पुन्हा एकदा एका हिंदी शोमध्ये शीर्षक भूमिकेत झळकणार आहे.

‘माय नेम इज शीला’मध्ये स्मिताचा जलवा
SHARES

सध्या मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावणारी अभिनेत्री स्मिता तांबे आता ‘माय नेम इज शीला’ असं म्हणत पुन्हा एकदा एका हिंदी शोमध्ये शीर्षक भूमिकेत झळकणार आहे.


शीलाची भूमिका

आजवरच्या अभिनय कारकिर्दीत स्मितानं नाना तऱ्हेच्या भूमिका साकारल्या आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘जोगवा’, ‘देऊळ’, ‘तुकाराम’, ’७२ मैल’, ‘बायोस्कोप’ या चित्रपटांमध्ये अभिनयाचे विविध रंग दाखवणाऱ्या स्मितानं रोहित शेट्टीच्या ‘सिंघम रिटर्न’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सावट’मध्ये तिनं साकारलेली डॅशिंग पोलिस अधिकारीही लक्ष वेधून घेणारी ठरली होती. आता ती ‘माय नेम इज शीला’मध्ये शीलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.


ट्रेलर लाँच

सध्या शार्ट फारमॅट कंटेंट लोकप्रिय होत असल्यानं इरास नाऊनंही आपलं लक्ष अशाच प्रकारच्या शोजवर केंद्रित केलं आहे. ‘डेट गान राँग’, ‘पैसा फेक तमाशा देख’ आणि ‘तुमसे ना हो पाएगा’ या कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. याच वाटेवरील ‘माय नेम इज शीला’ या आगामी शोचा ट्रेलर लाँच इरासनं केला आहे. या शोची कथा शीला नावाच्या मोलकरणीवर आधारित असून, हिला सोशल मीडियावर स्टार बनायचं आहे. या शोमध्ये शीलाच्या भूमिकेत स्मिता दिसणार आहे.


३० मे पासून प्रसारीत

स्टँड-अप कामेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारी स्मिता ‘माय नेम इज शीला’मध्येही काही गंमतीशीर प्रसंगांद्वारे रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणार आहे. ‘माय नेम इज शीला’ हा शो इरास नाऊची निर्मिती असून, नितेश सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे. या शोमध्ये स्मिताच्या जोडीला गणेश यादव, अंकित बाठला, अशीमा यार्दान आणि फिरदौस मेवावाला यांच्याही भूमिका आहेत. ‘सिंघम रिटर्न’ नंतर स्मिता आणि गणेश यादव ‘माय नेम इज शीला’मध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत. आपलं दैनंदिन कामकाज करताना काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी हा शो प्रेरणादायी ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. ३० मे पासून इरास नाऊवर हा शो प्रसारीत होणार आहे.हेही वाचा -

विठूराया १२ बलुतेदारांच्या रुपात देणार दर्शन

नवाज-मौनीच्या ‘बोले चुडीयां’चं पोस्टर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा