Advertisement

विठूराया १२ बलुतेदारांच्या रुपात देणार दर्शन

आध्यात्मिक मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. प्रेक्षकांना असलेल्या या आकर्षणामुळंच 'विठूमाऊली' या मालिकेनं ५०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. आता या मालिकेत विठूराया १२ बलुतेदारांच्या रूपात दर्शन देणार आहेत.

विठूराया १२ बलुतेदारांच्या रुपात देणार दर्शन
SHARES

आध्यात्मिक मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. प्रेक्षकांना असलेल्या या आकर्षणामुळंच 'विठूमाऊली' या मालिकेनं ५०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. आता या मालिकेत विठूराया १२ बलुतेदारांच्या रूपात दर्शन देणार आहेत.


५०० भाग पूर्ण

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेली 'विठुमाऊली' या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे. विठूरायांच्या वारकऱ्यांसोबतच इतर भाविकांनीही या मालिकेवर प्रेम केलं आहे. या प्रेमामुळंच या मालिकेनं नुकतेच ५०० भाग पूर्ण केले आहेत. हा आनंद मालिकेच्या सेटवर विठूमाऊलीचं चित्र असलेला केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम, निर्माते महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे होते. 'विठुमाऊली' मालिकेचा ५०० भागांचा हा प्रवास रोमांचक होताच यापुढचा प्रवास आणखी उत्कंठावर्धक होणार आहे.


विठुरायाची साथ

'विठुमाऊली' मालिकेत सध्या विठुरायाच्या मंदिराच्या उभारणीचा प्रवास पाहायला मिळत आहे. विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकानं हे पवित्र काम हाती घेतलं आहे. पुंडलिकाच्या या प्रवासात बरेच अडथळेही येत आहेत. पुंडलिकाचं मंदिर उभारण्याचं हे कार्य पूर्ण होऊ नये, म्हणून कलीचेही प्रयत्न सुरु आहेत. या अडथळ्यांवर मात करत पुंडलिक मंदिराची उभारणी कशी करणार? याचा रंजक प्रवास 'विठुमाऊली'च्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुंडलिकाच्या या प्रवासात आजवर विठुरायाची साथ त्याला नेहमीच मिळाली आहे. 


कलीचा नाश 

यावेळेस तर विठ्ठलानं पुंडलिकाच्या सहाय्यासाठी १२ बलुतेदारांची रुपं घेतली आहेत. यात लोहार, चांभार, परीट, सुतार, कुंभार, गवळी, सोनार, महार, कोळी, न्हावी, जोशी आणि गुरव अशी दहा रुपं आहेत. विठुमाऊलीच्या आणखी दोन रुपांचं दर्शन मालिकेतून लवकरच घडणार आहे. १२ बलुतेदारांच्या विराट दर्शनानंतर विठुराया कलीचा नाश कसा करणार याची गोष्ट पुढे पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

नवाज-मौनीच्या ‘बोले चुडीयां’चं पोस्टर

Movie Review : विक्षिप्त विचारसरणी विरोधातील न्यायालयीन लढा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा