नवाज-मौनीच्या ‘बोले चुडीयां’चं पोस्टर

आजवर बऱ्याचदा खलनायक साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या ‘बोले चुडियां’ या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

SHARE

आजवर बऱ्याचदा खलनायक साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या ‘बोले चुडियां’ या आगामी हिंदी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.


लुक रिव्हील 

नवाजुद्दीनच्या मागील काही चित्रपटांकडं बारकाईनं लक्ष दिलं तर असं लक्षात येतं की, त्यानं खलनायकी भूमिकांसोबतच काहीशा विनोदी आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकाही सशक्तपणं साकारत प्रेक्षकांचा कौल मिळवला आहे. त्यामुळं नवाजुद्दीनचा ‘बोले चुडियां’ हा चित्रपट त्या पुढील एक पाऊल असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटात तो चक्क प्रियकराच्या भूमिकेत दिसणार असून, त्याची नायिका बनली आहे मौनी राय. या चित्रपटातील नवाज आणि मौनी यांचा लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे.


वेगळ्या रूपात 

दिग्दर्शक शामस नवाब सिद्दीकी आपल्या पहिल्याच चित्रपटात नवाजुद्दीनला एका वेगळ्या रूपात सादर करणार आहेत. सिद्दीकी यांनीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या चित्रपटातील दोघांचाही लुक प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये एकीकडं टी-शर्ट, पँट आणि बूट घातलेला हाताची घडी घालून उभा असलेला नवाजुद्दीन दिसतो, तर दुसरीकडं दारामागून डोकावणारी साजश्रृंगार केलेली मौनी दिसते. नवाजुद्दीन आणि मौनी यांची दोन वेगवेगळी पोस्टर्स सिद्दीकी यांनी एकत्रितपणं शेअर केली आहेत.


केमिस्ट्रीवर चित्रपटाचं यश 

सिद्दीकी यांनी जय हिंद कुमार यांच्यासोबत या चित्रपटाचं लेखन केलं आहे. घोषणा केल्यापासूनच ‘बोले चुडियां’ या चित्रपटाबद्दल सर्वांनाच कुतूहल होतं. सुरुवातीला केवळ नवाजुद्दीनच्या नावाची घोषणा केली गेल्यानं त्याची नायिका कोण बनणार? याबबतही खूप चर्चा रंगली. त्यानंतर मौनीची एंट्री झाली आणि दोघांची जोडी जमली. आता या जोडीची केमिस्ट्री पडद्यावर कशी दिसते आणि प्रेक्षकांना कितपत आवडते यावर चित्रपटाचं यश अवलंबून आहे.हेही वाचा -

Movie Review : विक्षिप्त विचारसरणी विरोधातील न्यायालयीन लढा
संबंधित विषय
ताज्या बातम्या