Advertisement

'या' सात टिप्समध्ये दडलेय अक्षयच्या फिटनेसचे रहस्य


'या' सात टिप्समध्ये दडलेय अक्षयच्या फिटनेसचे रहस्य
SHARES

अक्षय कुमार अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठी देखील तितकाच ओळखला जातो. फक्त जीममध्ये घाम गाळून बॉडी होत नाही तर त्यासाठी डाएटवर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे, असे अक्षय मानतो. ५० वर्षीय अक्षयची गणना इंडस्ट्रीतल्या सर्वात फिट कलाकारांमध्ये होते. करीअरच्या सुरुवातीपासूनच म्हणजे १९९० पासूनच अक्षय आपल्या फिटनेससाठी सतर्क आहे. जिमिंग, डाएटिंगसोबत अक्षय मैदानी खेळ खेळण्यावर सुद्धा विश्वास ठेवतो. बास्केटबॉल, किक-बॉक्सिंग, योगा, पोहणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने देखील तो व्यायाम करतो. त्यामुळे ५०व्या वर्षी देखील अक्षय फिट आणि हिट आहे. नेमके त्याच्या फिटनेसचे काय रहस्य आहे? असा प्रश्न नेहमीच त्याच्या चाहत्यांना पडलेला असतो. खाण्यापिण्यापासून ते तो कशाप्रकारे आणि काय व्यायाम करतो याच्या काही टिप्स आम्ही त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत. 


सौजन्य 

१) रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे

रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, हे अक्षय अगदी तंतोतंत पाळतो. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील अक्षय त्याचा हा नियम कधीच मोडत नाही. रात्री १०ला अक्षय झोपून जातो. कित्येक वेळा तर सकाळी ४-५ वाजता उठून चित्रपटाचे शूटिंग अक्षयने केले आहे.

२) संध्याकाळजे जेवण ६.३० किंवा ७ वाजेपर्यंत करणे

फिट राहण्यासाठी डाएटवर नियंत्रण असणे फार गरजेचे आहे. दिवसातील शेवटचे जेवण संध्याकाळी साडे सहा किंवा सातपूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे जेवण चांगले पचेल. साधारण जेवणाचे नीट पचन व्हायला तीन ते चार तास लागतात. जर तुम्ही ७ वाजता जेवलात तर जेवण पचायला तीन ते चार तासांचा अवधी मिळेल. सहसा अक्षय सातनंतर काहीच खात नाही. पण खाल्लेच तर प्रोटिनयुक्त म्हणजे अंडी, ऑमलेट, सलाड  किंवा सूप असे पदार्थ खातो. जेवणानंतर शतपावली केल्याने तुम्हाला आणखी फरक जाणवेल, असे अक्षय मानतो.


सौजन्य

३) बॉडी बनवण्यासाठी कुठलीच पावडर घेत नाही

बॉडी बनवण्यासाठी हल्ली अनेकजण पावडर आणि शेक्सचा वापर करतात. पण अक्षय या गोष्टींचा वापर टाळतो. या बनावट गोष्टींचा वापर केल्याने बॉडी आर्टीफिशिअल दिसेल आणि अशी बॉडी कमी काळापुरती राहते. त्यामुळे घरी बनवलेले जेवण खाणेच अक्षय पसंत करतो.

४) निरोगी बॉडी बनवण्यासाठी नो शॉर्टकट

चांगली बॉडी किंवा सिक्स अॅप्स बनवण्यासाठी अक्षयने कधीच शॉर्टकट वापरला नाही. तीन किंवा चार महिन्यात सिक्स पॅक बनत नाहीत. त्यासाठी अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते, असे अक्षय म्हणतो. आर्टिफिशियल औषधे घेऊन सिक्स पॅक्स बनवता येत नसल्याचे अक्षय मानतो. आर्टिफिशियल औषधांमुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे तुमचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ बिघडते.


सौजन्य

५) नो स्मोकिंग

अक्षय हा नियम तर खूप काटेकोरपणे पाळतो. स्मोक करणे हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे अक्षय मानतो. यामुळे तुमचा स्टॅमिना कमी होतो. त्यामुळे अक्षय चार हात स्मोकिंगपासून लांब राहिला आहे.

६) नो जंक फूड

अक्षयला मधल्या वेळेत भूक लागल्यास शेंगदाणे किंवा एखादे फळ खातो. 

७) खूप पाणी पिणे

अक्षयनुसार दिवसाला ५ ते ६ लीटर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा