Advertisement

'हाऊसफुल ४' चा धमाकेदार ट्रेलर लाँच

'हाऊसफुल ४'चा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांचा लुक हा खूपच वेगळा आणि हटके दिसत आहे.

'हाऊसफुल ४' चा धमाकेदार ट्रेलर लाँच
SHARES

साजिद नाडियाडवाला निर्मित 'हाऊसफुल ४'चा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी तगडी स्टारकास्ट आहे.  


कलाकारांचा हटके लुक

चित्रपटामध्ये २०० वर्षांपूर्वीचा काळ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांचा लुक हा खूपच वेगळा आणि हटके असा दिसत आहे. तसंच प्रत्येकाची भूमिका आणि कॉमिक टायमिंगही खूप भन्नाट असेल, असं ट्रेलर पाहून जाणवत आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे


कॉमेडीचा डबल डोस

चित्रपटात बॉलिवूडचा हास्यसम्राट जॉनी लिव्हर आणि त्याची मुलगी जेमी लिव्हरसुद्धा पाहायला मिळणार आहे. बाबाच्या भूमिकेत असलेला नवाजुद्दीनचा या चित्रपटात काय लूक आणि कशी भूमिका असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.हेही वाचा

जेव्हा खरे पोलीस खोट्या पोलिसांना सलाम करतात…

अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!संबंधित विषय
Advertisement