जेव्हा खरे पोलीस खोट्या पोलिसांना सलाम करतात…

पडद्यावर आपण नेहमीच पोलीस पाहतो. पडद्यावरील हे खोटे पोलीस वास्तवातील पोलिसांचं प्रतिनिधीत्व करणारे असतात, पण जेव्हा खोटे आणि खरे पोलीस आमनेसामने येतात, तेव्हा काय घडतं ते जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणारं आहे.

SHARE

पडद्यावर आपण नेहमीच पोलीस पाहतो. पडद्यावरील हे खोटे पोलीस वास्तवातील पोलिसांचं प्रतिनिधीत्व करणारे असतात, पण जेव्हा खोटे आणि खरे पोलीस आमनेसामने येतात, तेव्हा काय घडतं ते जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणारं आहे.

एमएक्स प्लेअरवर मराठी ओरिजनल्स 'पांडू' ही नवीन आणि अनोखी वेबसिरीज सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित असणाऱ्या या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के मुख्य भूमिका निभावत आहेत. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचं चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक सारंग साठेनं शूटिंगच्या वेळी घडलेला एक गंमतीदार किस्सा सांगितला.

सारंग म्हणाला की, 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांवर आधारित असल्यानं आमचं बरंचसं शूटिंग पोलीस व्हॅनमध्येच व्हायचं. आम्हाला एका सोसायटीच्या आवारात आणि त्या सोसायटीच्या थोडं बाहेर शूटिंग करण्याची परवानगी मिळाली होती. एकदा पेट्रोलिंगचा सीन शूट करत असताना, आम्ही गाडी चालवत नकळतपणं आमच्या नेमून दिलेल्या परिसराबाहेर गेलो. थोडं पुढं गेल्यावर तिथल्या एका सिग्नलवर आम्हाला खऱ्या पोलिसांनी पकडलं आणि आम्ही पुरते गोंधळून गेलो.

खऱ्या पोलिसांना समोर पाहिल्यावर सुरुवातीला काही सेकंद आम्हाला काही समजलंच नाही. आमच्या व्हॅनमध्ये बसलेल्या खोट्या पोलिसांना म्हणजेच सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोघांना खरे पोलीस अगदी निरागसतेनं सलाम करत होते. ते खोटे पोलीस आहेत आणि आम्ही शूटिंग करत आहोत हे त्यांना समजल्यावर त्यांनी आमच्याकडं शूटिंगसाठी आवश्यक परवानगी आहे का? अशी चौकशी केली. मात्र आमच्याकडे असलेली परवानगी आणि कागदपत्रे पुरेसं नव्हतं. कारण अशा परवानगीच्या नियमात आता बरेच बदल झाले असल्याने अधिक कागदपत्रे आमच्याकडे नव्हती. यात आमचा बराच वेळ गेला.

शेवटी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही आमच्या शूटिंगला पुन्हा सुरवात केली. मात्र खरे पोलीस ज्या पद्धतीनं खोट्या पोलिसांना सलाम करत होते, त्यांचा त्यावेळचा चेहरा आणि आमची अवस्था आठवून आम्ही पोट धरून धरून हसत होतो. आजही आम्ही एकत्र जमतो तेव्हा हा किस्सा आठवून खूप हसतो. आता हसायला येतं मात्र तेव्हा आमची पुरती घाबरगुंडी उडाली होती. हा आमच्या सर्वांसाठीच खूप मजेशीर आणि अविस्मरणीय प्रसंग होता किंबहुना कायम राहील.



हेही वाचा -

अंकुश चौधरीच्या सिनेमाला ट्रॅफिक पोलिसांचा धोका!

अॅमी जॅक्सनच नाही, तर या अभिनेत्रीसुद्धा झाल्यात लग्नाआधी प्रेग्नंट!




संबंधित विषय
ताज्या बातम्या