अंकुश चौधरीच्या सिनेमाला ट्रॅफिक पोलिसांचा धोका!

मराठीतील काही सरळमार्गी अभिनेत्यांपैकी एक आहे अंकुश चौधरी, पण सरळमार्गी असूनही त्याच्या आगामी मराठी सिनेमाला वाहतूक पोलिसांपासून धोका निर्माण झाला आहे.

  • अंकुश चौधरीच्या सिनेमाला ट्रॅफिक पोलिसांचा धोका!
  • अंकुश चौधरीच्या सिनेमाला ट्रॅफिक पोलिसांचा धोका!
  • अंकुश चौधरीच्या सिनेमाला ट्रॅफिक पोलिसांचा धोका!
  • अंकुश चौधरीच्या सिनेमाला ट्रॅफिक पोलिसांचा धोका!
SHARE

मराठीतील काही सरळमार्गी अभिनेत्यांपैकी एक आहे अंकुश चौधरी, पण सरळमार्गी असूनही त्याच्या आगामी मराठी सिनेमाला वाहतूक पोलिसांपासून धोका निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात सर्वच ठिकाणी वाहतूक नियमांचं काटेकोरपणं पालन करण्यात येत आहे. देशातील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा फटका अंकुशच्या सिनेमालाही बसू शकतो. कारण महाराष्ट्रात तरी ट्रीपल सीटची अनुमती नाही आणि अंकुश नेमकं हेच करताना दिसणार आहे. ‘नो एंट्री – पुढे धोका आहे’ या ‘नो एंट्री’ या हिंदी सिनेमाच्या मराठी रिमेकमध्ये अंकुशनं येणाऱ्या धोक्याचा सामना चलाखीनं केला होता, पण आता पुन्हा एकदा त्याला धोका निर्माण झाला आहे. ‘डबल सीट’ हा सिनेमा हिट झाल्यानंतर अंकुश ‘ट्रीपल सीट’ घेऊन येत आहे. या सिनेमाचं टायटल वाहतूक पोलिसांच्या दृष्टीनं थोडं गंमतीशीर असल्याचं म्हणायला हरकत नाही.


‘आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोकं फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याचा प्रवास हा यातूनच पुढं जात असतो’. अशाच कृष्णा सुर्वेची मनोरंजक कथा संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. यंदा दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अंकुश चौधरीसोबत शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश हात जोडत स्वतःची ओळख करून देत, आपण आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी असून आपली स्टेअरिंग वरच्याच्या हाती असल्याचं सांगतो.

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांचं असून, सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश–विश्वजित यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत लाभलं आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीतं आहेत. तगडी स्टारकास्ट आणि अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=XtqaCL2s3hs

हेही वाचा  -


'गर्ल्स' समोर आणणार पडद्यामागच्या या गोष्टी


गणपती ‘बाप्पा’ करणार प्रेक्षकांचं मनोरंजन !


संबंधित विषय
ताज्या बातम्या