Advertisement

गणपती ‘बाप्पा’ करणार प्रेक्षकांचं मनोरंजन !

नेहमीच नवनवीन प्रयोगांनी सज्ज असलेल्या मराठी सिनेसृष्टीत लवकरच एका आगळ्यावेगळ्या कथानकाच्या माध्यमातून चक्क गणपती ‘बाप्पा’ रसिकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

गणपती ‘बाप्पा’ करणार प्रेक्षकांचं मनोरंजन !
SHARES

नेहमीच नवनवीन प्रयोगांनी सज्ज असलेल्या मराठी सिनेसृष्टीत लवकरच एका आगळ्यावेगळ्या कथानकाच्या माध्यमातून चक्क गणपती ‘बाप्पा’ रसिकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

आद्यपूजनाचा मान प्राप्त असलेल्या श्री गजाननाचं वास्तव्य सर्व ठिकाणी असल्याचं मानलं जातं. बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा हा आपल्या संकटांचं निवारण करणारा असल्याची भक्तांमध्ये मान्यता आहे. त्यामुळंच विघ्न दूर करणारा हा 'विघ्नहर्ता' प्रत्येकाचा आवडता आहे. याच बाप्पाभोवती फिरणारी कथा आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा गमतीशीर आणि तितकाच उत्साहवर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाच्या निमित्तानं हिंदीतील आणखी एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसनं मराठीत पदार्पण केलं आहे. गरिमा प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा आप्पा आणि बाप्पा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या कथानकात काळानुरूप बदलत जाणाऱ्या उत्सवांच्या रूपावरही प्रकोशझोत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्सवांच्या नावाखाली आपण काय करतोय, याचं चित्रण करत आरसा दाखवण्याचं कामही हा सिनेमा करणार आहे.

या सिनेमाच्या निमित्तानं भरत जाधव आणि सुबोध भावे हे मराठीतील दोन दिग्गज पुन्हा एकत्र आले आहेत. यापूर्वी दोघांनी ‘उलाढाल’ आणि ‘लाडीगोडी’ या दोन सिनेमांमध्ये काम केलं आहे, पण त्यापैकी ‘लाडीगोडी’मध्ये दोघं एकत्र दिसले नाहीत. या दोघांखेरीज मराठी सिनेसृष्टीतील हुकूमी एक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप प्रभावळकरांचाही खुमासदार अभिनय या सिनेमात पहायला मिळेल. यांच्या जोडीला संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे, उमेश जगताप आदि कलाकार आहेतच. गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केलं आहे.

 https://youtu.be/GfNvLq6XbRsहेही वाचा -

आरोह वेलणकरनं अशी दिली चाहत्यांना ट्रिट

रस्त्यावरील कुत्र्याची आयफामध्ये एन्ट्री, दिली मुलाखत, हा व्हिडिओ जिंकेल तुमचं मन
संबंधित विषय
Advertisement