Advertisement

'सुपर हिरो है ये पगला'


'सुपर हिरो है ये पगला'
SHARES

'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटानंतर अक्षय कुमार आणखी एक चित्रपट घेऊन येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. अक्षयनं त्याचा आगामी चित्रपट 'पॅडमॅन'चा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.पोस्टरवर अक्षय कुमार सुपर हिरोच्या पोजमध्ये दिसत आहे. त्यानं पांढरा पायजामा आणि पांधरा शर्ट असा पोषाख घातला आहे. 'सुपर हिरो है ये पगला', असं पोस्टरवर लिहण्यात आलं आहे. चित्रपटाची रिलीज डेटही पोस्टरवर आहे. अक्षय कुमारनं रविवारी चित्रपटाचा अर्धा फोटो शेअर केला होता. फोटोला त्यानं कॅप्शन दिलं होतं की, 'उद्या मी येत आहे.''पॅडमॅन' चित्रपटात अक्षय कुमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात राधिका ही अक्षयची पत्नी दाखवली आहे तर सोनमवर अक्षयचं प्रेम असतं. या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी म्हणजेच ट्वींकल खन्ना देखील निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. महानायक अमिताभ बच्चन देखील चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत आहेत.'पॅडमॅन' हा चित्रपट अरूणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. आर. बल्की यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून २६ जानेवारी २൦१८ ला चित्रपट प्रदर्शित होईल.हेही वाचा

'सल्लू की शादी'ला तुम्ही येणार ना?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा