Advertisement

अंड्यातले ऋषी कपूर आणि शंभरीपार अमिताभ बच्चन!

१०२ नॉट आऊट या चित्रपटाचे एक मजेशीर पोस्टर रिलीज करण्यात आले. येत्या ४ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिताभ आणि ऋषी कपूर यांची जोडी अजुबा या चित्रपटात या आधी बघायला मिळाली होती.

अंड्यातले ऋषी कपूर आणि शंभरीपार अमिताभ बच्चन!
SHARES

२०१८ मध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी तब्बल २७ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. १०२ नॉट आऊट या आगामी चित्रपटात ही जोडी धम्माल करताना दिसणार आहे. शुक्रवारी या चित्रपटाचे एक मजेशीर पोस्टर रिलीज करण्यात आले. येत्या ४ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिताभ आणि ऋषी कपूर यांची जोडी अजुबा या चित्रपटात या आधी बघायला मिळाली होती.

ऋषी कपूर यांना एका अंड्यामध्ये बसलेलं बघून अमिताभ बच्चन हसत आहेत. असं हे मजेशीर नवं पोस्टर आहे. त्यात या पोस्टरवरची टॅगलाईन सगळ्यात मजेशीर आहे. 'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' असं या अंड्यावर लिहिलेलं आहे.


 

काय आहे चित्रपट

या चित्रपटात अमिताभ यांचे वय १०२ वर्ष दाखवण्यात आले आहे. अमिताभ यांना पृथ्वीवरील सर्वांत वयोवृध्द व्यक्तीचा रेकॉर्ड मोडायचा असतो. ऋषी कपूर हे अमिताभ यांच्या मुलाच्या भुमिकेत दिसणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त परेश रावल यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.

या चित्रपटातील भूमिकेसाठी अमिताभ यांना मेकअपसाठी तीन तास लागायचे. तर मेकअप उतरवायला ३ तास लागायचे. चित्रपटाचा ट्रेलर या आधीच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ओह माय गॉड फेम दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला आहे.



हेही वाचा

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या शुटिंगवेळी अमिताभ यांची प्रकृती बिघडली


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा