Advertisement

अमिताभ म्हणतात, "आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे"

सध्या अमिताभ बच्चन KBC चा 12वा सीझन होस्ट करतात. पण आता या शोला अलविदा करणार असल्याची बातमी खुद्द बिग बींनी दिली आहे.

अमिताभ म्हणतात, "आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे"
SHARES

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 12' (Kaun Banega Crorepati 12) या शोचं होस्टिंग तब्बल १४ वर्ष करत आहेत. पण अमिताभ यांच्या ब्लॉगमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शेवटच्या शूटिंगचा उल्लेख केला आहे.

सध्या अमिताभ बच्चन KBC चा 12वा सीझन होस्ट करतात. पण आता या शोला अलविदा करणार असल्याची बातमी खुद्द बिग बींनी दिली आहे. नुकतंच त्यांनी या शोच्या शेवट्याच्या एपिसोडचं (Last Episode) शूटिंग पूर्ण केल्याचं, त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं आहे.

अमिताभ सांगतात की, 'शूटच्या शेवटच्या दिवशी निरोप देताना बाकी उरत ते म्हणजे फक्त प्रेम आणि आपुलकी. या शोचा सुंदर प्रवास कधीही थांबू नये असंच वाटतं, पण पुढे जाणं हा सृष्टीचा नियम आहे. शोच्या शेवटच्या दिवशी शोचे सर्व सदस्य सेटवर एकत्र जमले. प्रत्येक क्रू आणि टिममधले सदस्य खूप काळजी घेणारे आणि मेहनती होते. KBC माझ्यासाठी कायमच विशेष असेल आणि मला कायमच KBC साठी विशेष ओढ जाणवेल.

'कौन बनेगा करोडपती'चा हा प्रवास माझ्यासाठी कायम अविस्मरणीय असेल'. तसंच या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी उल्लेख केला आहे की, 'मी सर्वांपुढे दिलगीर व्यक्त करतो, पण मी आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे.'

कौन बनेगा करोडपती हा शो ३ जुलै २००० पासून प्रसारित झाला होता. कार्यक्रमाचं स्वरूप आणि महत्वाचं म्हणजे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असल्यामुळे या शो ला घराघरातून मोठी पसंती मिळाली. २० वर्षात घराघरात पोचलेल्या या लोकप्रिय कार्यक्रमाला अमिताभ यांनी तब्ब्ल १४ वर्ष होस्ट केलं.



हेही वाचा

विजय स्टारर मास्टर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ४२ कोटींची कमाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा