Advertisement

विरुष्काचा तो फोटो तुम्ही पाहिलात का?


विरुष्काचा तो फोटो तुम्ही पाहिलात का?
SHARES

अनुष्का शर्माने विराटबरोबरचा तो फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनीटातच त्याला २० लाख लाईक्स मिळाले आहे. अनुष्का विराटला किस करतानाचा तो क्षण विराटने आपल्या कॅमेरात कैद केला. आणि तो फोटो अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अनुष्काने हा फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


💑

A post shared by  AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

नुकताच विराट दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावरून मुंबईत परतला आहे. तर अनुष्का आपल्या सुई-धागा या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण संपवून रविवारी मुंबईत परतली. यावेळी विराट अनुष्काला एअरपोर्टवर आणायला गेला होता. लग्नानंतर या दोघांनी आपल्या व्यस्त शेडूल्डमुळे एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवला नाही. सध्या दोघही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

My one and only! ♥️😇♥️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

या आधीही या दोघांनी आपलं प्रेम वेळोवेळी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. या दोघांनीही एकमेकांबरोबरचे अनेक स्पेशल क्षण इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केले आहेत. ११ डिसेंबरला या दोघांनी इटलीमध्ये विवाह केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा