Advertisement

कपूर घराण्यात कोरोनाचा शिरकाव, एक पार्टी ठरतेय डोकेदुखी

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कपूर घराण्यात कोरोनाचा शिरकाव, एक पार्टी ठरतेय डोकेदुखी
SHARES

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अर्जुनसोबत बहीण अंशुला कपूर, सोनम कपूरची बहीण रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

रिया कपूर आणि करण हे करिश्मा कपूरच्या ख्रिसमस पार्टीत सहभागी झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे अर्जुन कपूरला एका वर्षात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांमध्ये मलायका अरोराचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं आहे.

नुकताच अभिनेता रणवीर शौरीच्या १० वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. रणवीर आपल्या मुलासोबत गोव्याला व्हेकेशनला गेला होता. दरम्यान परतताना त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

तसंच काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या करिना कपूर, महिप कपूर,शनाया कपूर, अमृता अरोरा यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. पण त्यांनी कोरोनावर पुन्हा मात केली आहे. नुकतंच करीना कपूरनं अमृता अरोरा सोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याला we are back असं कॅप्सही दिलं होतं.

दरम्यान, मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. याचाच चित्रपटाच्या शुटिंगवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या वतीनं मुंबईत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कपिल शर्माने देखील आपल्या शोचे चित्रिकरण काही काळ थांबवले आहे.

तसंच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात शाहिदचा जर्सी, अक्षय कुमारचा पृथ्वीराज यांचा समावेश आहे. सोबतच कोरोनाच्या भितीमुळे दिल्लीत थिएटर बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात देखील रुग्ण वाढले तर कठोर निर्बंध केले जाऊ शकतात.हेही वाचा

बॉलिवूडमध्ये ओमिक्रॉनची दहशत, 'या' चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा