Advertisement

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या
Asif Basara commits suicide
SHARES

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा (Asif Basra) यांनी आत्महत्या (Suicide Case) केली आहे. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळामध्ये मॅक्डोलगंज हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ गुरुवारी त्यांनी आत्महत्या केली आहे.

त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून पोलीस या प्रकरणाचे सखोल चौकशी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशी माहिती मिळते आहे की, आसिफ बसरा गेल्या ५ वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहत असे.

आसिफ बसरा UK मधील एका महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर त्याच कुत्र्याच्या दोरीने त्यांनी गळफास घेतला. गेल्या काही काळापासून ते नैराश्याचा सामना करत असल्याची देखील चर्चा आहे.

आसिफ बसरा एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘परजानियां’ ब्लॅक ‘फ्रायडे’ याबरोबच त्यांनी अमेरिकन कॉमेडी सिनेमा आउटसोर्समध्ये देखील काम केले होते. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या सिनेमात त्यांनी अभिनेता इम्रान हाश्मीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.



हेही वाचा

स्कूबी डू कार्टूनची निर्मिती करणारे कार्टूनिस्ट केन स्पीअर्स यांचे निधन

KBC 12: नाझिया नसीम ठरली 'या' पर्वाची करोडपती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा