Advertisement

स्कूबी डू कार्टूनची निर्मिती करणारे कार्टूनिस्ट केन स्पीअर्स यांचे निधन

केन यांचा मुलगा केव्हीन यानं त्यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली.

स्कूबी डू कार्टूनची निर्मिती करणारे कार्टूनिस्ट केन स्पीअर्स यांचे निधन
SHARES

स्कूबी डू’ या लोकप्रिय कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८२ वर्षी अखेरचा श्वास घेतला. केन यांचा मुलगा केव्हीन यानं त्यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली.

गेली काही वर्षे ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात केविन आणि क्रिस ही दोन मुले, दोन सूना, पाच नातू आणि तीन पणतू आहेत.

स्पीअर्स यांचा जन्म १२ मार्च १९३८ मध्ये कॅलिफोर्निया इथं झाला होता. १९६९ मध्ये केन स्पिअर्स यांनी जो रबी यांच्या मदतीनं ‘स्कूबी डू’ या कार्टूनची निर्मिती केली होती. स्कूबी हा एक कुत्रा आहे. तो आपल्या मित्रमंडळींच्या मदतीनं विविध प्रकारच्या रहस्यांचा उलगडा करतो.

स्कूबी डू हे कार्टून आपल्या जबरदस्त पटकथेमुळे लोकप्रिय झाले. स्पीअर्स यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत या कार्टूनवर काम केलं. ते एक उत्तम स्केच आर्टिस होते. त्यांनी 'डायनोमुट', 'जबरजॉ' ‘फांगफेस,’ ‘मिस्टर टी,’ आणि‘सेक्टॉर’ या सीरिज बनवल्या.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा