Advertisement

'फोर मोर शॉट्स प्लीज!' चा दुसरा सिजन प्रेक्षकांना पसंत

"फोर मोअर शॉट्स प्लीज!" या वेबसिरीजचे इंटरनेटवरील चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

'फोर मोर शॉट्स प्लीज!' चा दुसरा सिजन प्रेक्षकांना पसंत
SHARES

"फोर मोअर शॉट्स प्लीज!" या वेबसिरीजचा दुसरा सिजन १७ एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्या सिजनप्रमाणेच दुसरा सिजन देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या वेबसिरीजचे इंटरनेटवरील चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

ट्विटरवर या वेबसिरीजचे अनेकांनी कौतुक केलं आहे. एकानं लिहलं आहे की, या वेबसिरीजसाठी Amezone चे धन्यवाद, उत्तम अभिनयासोबतच एक चांगली स्क्रिप्ट लिहली गेली आहे. संपूर्ण वेब सिरीज ३ दिवसात संपवली. आता पुढच्या सिजनची वाट पाहत आहे. अन्य प्रेक्षकांनीही असाच प्रतिसाद दिला आहे.

एकंदरीतच जनता जनार्दननं या वेबसिरीजला पसंती दर्शवली आहे. फक्त पसंतीच नाही तर प्रेक्षक पुढच्या सिजनची देखील आतुर्तेनं प्रतिक्षा करत आहेत. दुसऱ्या सिजनच्या संमाप्तीसोबतच तिसऱ्या सिजनसाठी दरवाजे उघडले गेल आहेत. वेबसिरीजमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींनी प्रत्येक आनंदात आणि दुःखात एकमेकांना साथ दिली. वेबसिरीजच्या याच कहाणीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

शोचा पहिला सीझन अनु मेनन यांनी दिग्दर्शित केला होता. तर दुसर्‍या सीझनचे दिग्दर्शन नुपूर अस्थाना यांनी केलं आहे. वेबसिरीजच्या स्टारकास्टमध्ये कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता, मानवी गगरू आणि बानी जे या मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका Amazon प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. Lockdown 2.0 च्या दरम्यान तुम्ही ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजचा आनंद घेऊ शकता!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा