'शुभ मंगल सावधान'चा ट्रेलर प्रदर्शित

 Mumbai
'शुभ मंगल सावधान'चा ट्रेलर प्रदर्शित
Mumbai  -  

दिग्दर्शक आनंद एल रॉय यांच्या 'शुभ मंगल सावधान' चित्रपटाचा ट्रेलर पर्दर्शित झाला आहे. या चित्रपटात आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात भूमीचा नवीन लूक पाहायला मिळत आहे. तर आयुषमान पुन्हा एकदा देसी अंदाजात दिसत आहे


शुभ मंगल सावधान चित्रपटाच्या माध्यमातून 'नॉट सो हॉट' आणि 'नॉट सो कूल' जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील रोमान्स आणि त्याला मनोरंजनाचा देसी तडका हे आनंद एल रॉय यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. या चित्रपटात सुद्धा तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे.१ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला होता.आयुषमान आणि भूमी या दोघांनी चित्रपटाचा ट्रेलर ट्वीटरवर शेअर केला आहे. 'सुगंधा,सबको पता चल गई है अपनी स्टोरी,’ असे कॅप्शन देखील आयुषमानने दिले आहे. तर भूमीने, 'मैं और मुदित आ गए है इस शुभ घडी में, सब सावधान रहना, बहुत ही मंगल होने वाला है,’ असे कॅप्शन दिले आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

Loading Comments