Advertisement

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बॉलीवुडचा सिंघम अर्थात अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
SHARES

बॉलीवुडचा सिंघम अर्थात अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा असा चित्रपटाचा ट्रेलर आहे. भारतीय वायुसेनेचे आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्या पराक्रमावर प्रेरीत भुज चित्रपट आहे.

थरारक घटनांचे सीक्वेन्स, भावनांच्या अनेक छटा, देशप्रेम आणि भुजमधील लोकांची एकता चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रतीत होत आहे. ट्रेलरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ट्रेलरमधील डायलॉग्स. प्रेक्षकांना खिळवूण ठेवण्यात सर्वात मोठी भूमिका हे डायलॉग्स बजावत आहेत. अशातच अजय देवगणला सैनिकाच्या भूमिकेत पाहूनही चाहते खूश झाले आहेत. तसंच संजय दत्त यांचीही भूमिका लक्ष वेधून घेते.

अनेक तरुणांची क्रश असलेली नोरा फतेही देखील या चित्रपटात दिसून येणार आहे. नोरा या चित्रपटात आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. जरी ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हाला फार कमी स्क्रिन स्पेस दिसत असली, तरी तिची भूमिका महत्त्वाची आहे.

यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ १३ ऑगस्ट २०२१ रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

याअगोदर डिस्ने + हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. ज्यात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा