Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण


बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण
SHARES

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचे नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

'आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon', असं ट्वीट अक्षय कुमार यानं केलं आहे.

अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर असलेल्या राम-सेतू या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक त्याने नुकतंच शेअर केला होता. माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’ अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती.

राम सेतू हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आलिया भट्ट, आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा