Advertisement

अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावली, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अभिनेता इरफान खानची प्रकृती खालावली, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
SHARES

बॉलिवूड अभिनेता इरफान खान दीर्घ काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. आता बातमी आहे की, इरफानची प्रकृती अचानक खराब झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्या तब्येतीबद्दल अधिक माहिती येणं बाकी आहे.


नेमकं कारण समजलं नाही

नवभारत टाइम्स डॉट कॉमच्या एका वृत्तानुसार, इरफान सध्या रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू)मध्ये आहे आणि त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अहवालात असंही म्हटलं आहे की, अभिनेताला गेल्या आठवड्यातच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कारण त्याला कोरोनाव्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे नियमीत तपासणीच जाता येत नाही. 


त्याच्या आईचं नुकतंच निधन झालं

यापूर्वी इरफान खान परदेशात असल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता तो मुंबईत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अलीकडेच त्याच्या आईचे जयपूरमध्ये निधन झाले आणि त्याला लॉकडाऊनमुळे जयपूरमध्ये आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता आले नाही. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे इरफाननं आपल्या आईचं अंत्यदर्शन घेतलं होतं.


२०१८ साली केला आजाराचा खुलासा

इरफान खाननं १६ मार्च २०१८ मध्ये आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. 'आपण अपेक्षा करतो, ते देणे आयुष्यासाठी बंधनकारक नाही' या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफाननं पोस्ट केला होता. त्यानंतर 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर'चे निदान झाल्याची माहिती इरफाननं दिली होती.


२०१८ मधील त्याची प्रतिक्रिया

'अनपेक्षित गोष्टींमुळे आपली वाढ होते. गेल्या काही दिवसात तेच घडत गेलं. मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचं समजलं. सध्या तरी कठीण झालं आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचं प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावं लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो. न्यूरो म्हणजे प्रत्येक वेळी मेंदूशी संबंधित नाही, हेच उत्तर मी अफवांना देईन. गूगल करणे हा संशोधनाचा सोप्पा मार्ग आहे. ज्यांनी माझ्या शब्दाखातर वाट पाहिली, त्यांना आणखी किस्से सांगण्यासाठी मी परत येईन, हीच आशा' असं इरफाननं लिहिलं होतं.

त्यानंतर या आजारावर उपचार करण्यासाठी तो लंडनला गेला होता. दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला आणि आपल्या आजारातून सावरत 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचं चित्रीकरणही केलं होतं.



हेही वाचा

मुंबई पोलिसांना अक्षयकडून २ कोटींची मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा