Advertisement

राजकारणात असतो, तर तुरुंगात गेलो नसतो - संजय दत्त


राजकारणात असतो, तर तुरुंगात गेलो नसतो - संजय दत्त
SHARES

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा बॉलिवूडमधील पदार्पणास सज्ज झाला आहे. संजय दत्त 'भूमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय. २२ सप्टेंबरला त्याचा भूमी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी संजय दत्तने त्याच्या चाहत्यांसाठी खास एक मुलाखत दिलीय. या मुलाखतीत संजयनं 'भूमी' चित्रपटासोबतही इतर विषयांवर देखील गप्पा मारल्या

"तुरुंगातले दिवस न विसरण्यासारखे"

तुरुंगात गेल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने मी निराश झालो होतो. माझाकडं खूप वेळ असायचा. त्यामुळं मी तुरुंगात असलेली पुस्तकं वाचायला लागलो. महाभारत, भगवतगीता, रामायण शिव महापुराण, गणेश पुराण हे सर्व मी तुरुंगात वाचले. आता घरी पूजेसाठी पंडित आले की त्यांना मंत्र कसे उच्चारायचे हे मीच सांगतो, असं उत्तर संजयनं हसत हसत दिलं.


"येरवडा तुरुंगातील नाटक ग्रुप भन्नाट"

येरवडा तुरुंगात एक नाटक ग्रुप देखील आहे. या ग्रुपमध्ये ५० कैदी होते. हे सर्वजण हत्येच्या गुन्ह्याखाली तुरूंगात होते. पण सर्वजण स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना अभिनयाचे धडे देत होते. पण त्यांची अॅक्टिंग पाहून मला धक्काच बसला. तुरुंगात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या कैद्यांनी आपला अभिनय सर्वांसमोर सादर केला. या कैद्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. आपलं कौतुक होत असल्याचं पाहून या कैद्यांना अश्रू अनावर झाले. आमचं कधी कुणी कौतुक केलं नव्हतं. पहिल्यांदाच आम्हाला अभिमान वाटत असल्याचं बोलून ते माझ्याजवळ रडू लागले.  

       


तुरुंगात कमवलेल्या पैशाचं काय केलं?

तुरुंगात जे काही मी पैसे कमवले होते ते पैसे मी मान्यताच्या स्वाधीन केले. ते पैसे मान्यताने आजही संभाळून ठेवले आहेत. पेपर बॅग आणि खुर्ची बनवून मी हे पैसे कमावले होते


तुमच्या चांगुलपणाचा कधी कुणी फायदा उचलला आहे का?

दुसऱ्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणे हीच जगाची रित आहे. पण मी त्याबाबतीत भाग्यवान ठरलो. कठिण परिस्थितीत देखील अनेक जण माझ्या मदतीला धावून आले.


चार-पाच वर्षानंतर पुन्हा चित्रपटात काम करणं किती कठिण होतं?

१९९४ साली मी तुरुंगातून बाहेर आलो. त्यानंतर मी 'आतिश' या चित्रपटातून सुरुवात केली होती. आता मी 'भूमी' चित्रपटातून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. यात कठिण असे काहीच नाही. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मी तरूण होतो. आता मी पन्नाशी पार केली आहे.  'आतिश' हा अॅक्शन पट चित्रपट आहे. तर 'भूमी' वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारीत चित्रपट आहे


'भूमी' चित्रपट निवडण्याचं कारण?

मला 'भूमी' चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. माझ्या मनाला चित्रपटाची स्क्रिप्ट भावली. वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारीत हा चित्रपट आहे. शिवाय हा चित्रपटातून चांगला संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे मी या चित्रपटासाठी होकार दिला.  



'भूमी' चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस कसा होता?

बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटाच्या सेटवर गेलो तेव्हा खूप आनंद झाला. कॅमेरा, युनिट आणि लाइट्स पाहून खूप आनंद झाला. पहिल्या दिवशी मी डायरेक्टरला १० मिनिटांसाठी सेटवर एकटा बसण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार १० मिनिटं मी सेटवर एकटा बसलो आणि मग शूटिंगला सुरुवात केली.


राजकारणात येण्याचा कधी विचार केला आहे का?

मला राजकारणात नाही यायचं. एका नेत्यात जे गुण असतात ते माझ्यात नाही. मी राजकारणात असतो, तर तुरुंगात गेलो नसतो.


बॉलिवूड इंडस्ट्रीत काही बदल झाला आहे का?

बॉलिवूडमध्ये खूप बदल झाला आहे. त्यावेळी इंडस्ट्रीत एकता होती. पण आता तसं काहीच जाणवत नाही. प्रॉफेशनलिझमचाच बोलबाला आहे. पूर्वी एका पेपरवर चित्रपटाचे करार होत होते. आता एक मोठी फाईल असते. पण एक चांगले आहे की, आता चित्रपट ४०-५० दिवसांमध्ये पूर्ण होतात. याआधी एक चित्रपट पूर्ण होण्यासाठी २ वर्षे लागायची




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा