Advertisement

संजय दत्त रिटर्न्स!


संजय दत्त रिटर्न्स!
SHARES

संजय दत्तने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. संजय दत्तचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूमी'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात संजय दत्त वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आदिती राव हैदरी संजय दत्तच्या मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. वडील-मुलीच्या नात्यावर चित्रपटाचे कथानक आधारीत आहे.


'भूमी'ची कथा अतिशय भावूक आहे. संजयचे आपल्या मुलीवर खूप प्रेम असते. पण तीच मुलगी गावातल्या काही नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मग हा पिता संपूर्ण जगाशी लढतो. मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतो. भूमी चित्रपटातून पुन्हा एकदा संजयचा अॅक्शन धमाका पाहायला मिळणार आहे. या शिवाय चित्रपटात शरद केरकरची भूमिका पाहायला मिळणार आहे. शरद या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. 22 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


संजय दत्तचा पहिलाच चित्रपट...

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान अनेक अनुभव संजयने शेअर केले. "भूमी चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. मोठ्या कालावधीनंतर मी चित्रपटाच्या शूटिंगला हजर होतो. त्यामुळे थोडा नर्व्हस होतो. पण पहिला डॉयलॉग बोलताच पुन्हा आपल्या घरात आल्यासारखे वाटले. तो पहिला दिवस कायम माझ्या लक्षात राहील", अशा भावना संजयने व्यक्त केल्या.


भूमीच्या ट्रेलर लाँचमागे सरप्राईज!

भूमी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यामागचे कारण म्हणजे संजय दत्तची मुलगी त्रिशाला. त्रिशालाचा १० ऑगस्टला वाढदिवस असतो. त्रिशालाला बर्थ-डे सरप्राईज देता यावे या हेतूने हा ट्रेलर लाँच केला आहे आणि तिला बर्थ डे सरप्राईज आवडले आहे, असे संजय दत्तने सांगितले.


रणबीरला वाटले मीच संजूबाबा !

भूमी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अभिनेता रणबीर कपूरने देखील हजेरी लावली होती. रणबीर कपूरने संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजयची भूमिका साकारली आहे. रणबीर त्याच्या भूमिकेत प्रचंड गुंतला आहे. रणबीरने यासंदर्भातच एक मजेशीर किस्सा सांगितला. "मला संजूबाबाचा फोन आला. भूमी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला येण्याचे आमंत्रण मला संजूबाबाने दिले. पण मी संजू बाबाच्या भूमिकेत इतका गुंतलो आहे की, माझ्याच चित्रपटाचा ट्रेलर लाँच असल्याचे मला भासले. मी स्वत:ला टपली मारली आणि म्हटले 'बेटा तुम कभी संजय दत्त नहीं बन सकते', कल चुपचाप ट्रेलर लाँच पे जाओ!”



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा