Advertisement

खरा हिरो! अभिनेता सोनू सूदनं केली हजारो कामगारांची घरवापसी

लॉकडाऊनमध्ये (Lockdown 4) अशाच मुंबईत अडकलेल्या कामगारांसाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पुढे आला आहे.

खरा हिरो! अभिनेता सोनू सूदनं केली हजारो कामगारांची घरवापसी
SHARES

लॉकडाऊनमध्ये (Lockdown in Mumbai) परराज्यात अडकलेले कामगार आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारनं यासाठी काही रेल्वे देखील सुरू केल्या आहेत. मात्र असे असली तरी कामगारांची पायपीट थांबत नाही आहे. या कामगारांकडे घरी जाण्यासाठी पैसे देखील नाहीत. अशा स्थिती अनेकजण या कामगारंच्या मदतीसाठी पुढे येत आहे.

लॉकडाऊनमध्ये (Lockdown 4) अशाच मुंबईत अडकलेल्या कामगारांसाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पुढे आला आहे. त्यानं मुंबईतून कर्नाटकला जाण्यासाठी शेकडो कामगारांसाठी १० बसची सोय केली आहे. सोनू सूदनं केवळ बसचीच नाहीतर या कामगारांच्या जेवणाची देखील सोय केली.



सोनू सूदनं सर्वात आधी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून आवश्यक ती सर्व परवानगी घेतली. यानंतर ठाण्यावरून कर्नाटकमधील गुलबर्गा इथं जाण्यासाठी त्यानं कामगारांसाठी १० बसची सोय केली.

सोनू सूदनं म्हटलं की, या कठीण काळात प्रत्येक भारतीयाचा आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे. सोबतच त्यानं सरकारी अधिकाऱ्यांचे देखील आभार मानले. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा आणि झारखंड इथल्या कामगारांना देखील घरी जाण्यासाठी मदत करणार.

सोनू सूदची कामगारांना मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील तो कामगारांच्या, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मदतीला धावून आला आहे. याआधी त्यानं आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी मुंबईतलं आपलं हॉटेल दिलं होतं. तर कित्येत मजदूरांच्या रोजच्या जेवणाची सोय त्यानं केली होती. याशिवाय रमजानच्या पाक महिन्यात सोनूनं पंजाब आणि मुंबईतील डॉक्टरांना १ हजार ५०० पीपीई किट्स दिल्या. भिवंडी परिसरातील गरजू लोकांना अन्नदान केल्याचंही समोर आलं आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा