Advertisement

इन्स्टावर श्रद्धा बनली लोकप्रिय ‘स्त्री’!


इन्स्टावर श्रद्धा बनली लोकप्रिय ‘स्त्री’!
SHARES

बॉलिवूडमध्ये सध्या ‘स्त्री’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर १५० कोटी रुपयांचा बिजनेस करणाऱ्या या सिनेमामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलिवूडची टॉप ट्रेंडिग एक्ट्रेस बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, ‘स्त्री’मुळे डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर श्रद्धा सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.

प्रियंकाला टाकलं मागे

मागील काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच गेले कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वत्र दिसत होती. पण ‘स्त्री’ चित्रपटातल्या दमदार परफॉर्मन्समुळे श्रद्धाने प्रियंकालाही मागे टाकलंय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.


डिजीटल लोकप्रियतेत यांचाही नंबर

डिजीटल विश्वात सध्या श्रद्धा आणि प्रियंकाशिवाय ‘सुई धागा’ चित्रपटामुळे अनुष्का शर्मा आणि वेबसीरिजमुळे राधिका आपटेचा चाहतावर्ग खूप आहे. तसंच ‘मणिकर्णिका’ सिनेमामुळे कंगना रणौतसुद्धा चांगलीच पॉप्युलर आहे.

नंबर वन स्थानी पोहोचलेल्या श्रद्धाने १०० गुणांसह डिजीटल विश्वात या सर्व अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. डिजीटल लोकप्रियतेत श्रद्धानंतर प्रियंका ८९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर, अनुष्का ३६ गुणांसह तिसऱ्या जागी, राधिका २६ गुणांसह चौथ्या आणि कंगना २३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.


म्हणून श्रद्धा अग्रेसर

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, ‘स्त्री’ चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे आणि सिनेमाला प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामुळे श्रद्धाच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आली आहे. हा सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि त्याविषयीच्या होणाऱ्या इन्स्टा पोस्टमुळे श्रद्धा इन्स्टाग्रामवर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच.

श्रद्धा सध्या ‘बत्ती गूल मीटर चालू…’ या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्येही व्यग्र आहे. त्याविषयीही डिजीटलमाध्यमामध्ये लेख आणि पोस्ट होत आहेत. म्हणूनच डिजीटल आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर श्रद्धा अग्रेसर आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा