Advertisement

सनी झाली तीन मुलांची आई


सनी झाली तीन मुलांची आई
SHARES

पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओने पुन्हा एकदा आई झालीये. सनीने नुकताच जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. मागील वर्षी सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी निशा नावाची एक मुलगी दत्तक घेतली होती. आता सनीने स्वत:च्या मुलांना जन्म दिला आहे. या दोघांसोबत आपला फोटो शेअर करून सनीने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सनीने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. सनीने या फोटोला कॅप्शन देताना 'आता माझं कुटुंब पूर्ण झालं' असं म्हटलं आहे.

या फोटोत एक बाळ सनीच्या हातात आणि दुसरं बाळ सनीचा पती डॅनिएलच्या हातात आहे. आणि या दोघांच्या मध्ये छोटी निशा बसली आहे. निशाला महाराष्ट्राच्या लातूर येथील आश्रमातून सनीनं २०१७ मध्ये दत्तक घेतलं होतं. निशाच्या पहिल्या दिवसापासूनच ती स्टार किड झाली आहे.


 

हा फोटो शेअर करत सनी म्हणते, "हा देवाचाच प्लॅन होता. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आमचं कुटुंबं एवढं मोठं होईल. आमचं 'वेबर' कुटुंबं पूर्ण झालं! आम्ही सरोगसीचा निर्णय घेतला. अशर आणि नोहा ही आमची मुलं आहेत."


हेही वाचा 

सनी लिओनीने घेतले लातूरच्या मुलीला दत्तक!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा