Advertisement

बघा, तापसीचा जलवा!

तापसी पन्नूने एक फ्रेश फोटोशूट केलं आहे. ज्यात तिच्या सौंदर्याचा अनोखा जलवा पाहायला मिळतोय.

बघा, तापसीचा जलवा!
SHARES

अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला 'बदला' हा सिनेमा सध्या चांगलाच गाजत आहे. मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमात तापसीनं साकारलेल्या व्यक्तिरेखेचं कौतुक होत आहे. अशातच तापसीनं एक फ्रेश फोटोशूट केलं आहे. ज्यात तिच्या सौंदर्याचा अनोखा जलवा पाहायला मिळतोय.


'पिंक' या सिनेमानंतर तापसी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसल्यानं या सिनेमाला खूप महत्त्व प्राप्त झालं होतं. 'बदला' प्रदर्शित होतो न होतो तोच तापसीचे 'सांड की आँख' या सिनेमातील फोटोही व्हायरल झाले आहेत. या सिनेमात ती जगातील सर्वात जुन्या शार्पशूटरच्या भूमिकेत दिसणार आहे. आजवर शहरी लूकमध्ये दिसलेल्या तापसीचा या सिनेमात गावठी लूक पाहायला मिळणार आहे. 


'सांड की आँख'खेरीज तापसीच्या पर्समध्ये आणखी बरेच सिनेमे आहेत. यापैकी काहींचं शूटिंग पूर्ण झालं असून, काहींचं पोस्ट प्रॅाडक्शनचं काम सुरू आहे. 'तडका' या हिंदी सिनेमात तापसी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषेत बनणाऱ्या 'गेम ओव्हर'मध्येही तिच्या हटके अदा पाहायला मिळतील. या दोन्ही सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण झालं असून, सध्या पोस्ट प्रॅाडक्शनचं काम वेगात सुरू आहे.


तापसी सध्या मेरठमधील जोहरी या गावात 'सांड की आँख' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याखेरीज तापसीकडं आणखी एक सिनेमा आहे. जगन शक्ती यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमाचं शीर्षक 'मिशन मंगल' असं आहे. मार्स आॅर्बिटर मिशनमध्ये सहभागी झालेल्या इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशमधील शास्त्रज्ञांची कथा या हिंदी सिनेमात पाहायला मिळेल.

यात तापसीच्या जोडीला अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा हे कलाकारही आहेत. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे. या दरम्यान तापसीनं केलेलं हे खास फोटोशूट आणि त्यातील दिलखेचक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement