SHARE

समलैंगिक संबंधांबद्दल सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर समलैंगितकता हा गुन्हा नसल्याचं जाहीर झाल्याने समलैंगिक समुदायात जल्लोषाचं वातावरण आहे.

भारतीय दंड संहितेतील कलम 377 अवैध असून समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. या निकालामुळे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं कलम 377 रद्द झालं. यामुळे दोन सज्ञान व्यक्तींमधील समलैंगिक संबंध अपराध ठरू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करत बॉलिवूड सेलिब्रिटींनींही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


बॉलिवूडकरांच्या प्रतिक्रिया


अशा मुद्द्यांवर नेहमीच मोकळेपणाने विचार मांडणाऱ्या दिग्दर्शक करण जोहरने ट्वीट करत म्हटलं आहे, हा ऐतिहासिक निर्णय आहे, हा गौरवाचा क्षण आहे, समलैंगिक संबंध हा गुन्हा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयचा निकाल ऐतिहासिक आहे. हा मानवता आणि समानतेच्या हक्काचा निर्णय असून देशात स्वातंत्र्याने जगण्याची नवी उमेद आहे.


बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने सेक्शन 377 ला ट्विटरवर श्रद्धांजली वाहत प्रगतिशील भारतासाठी हा नवा प्रकाश आहे.


अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर लिहलं आहे, 377 वर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल कार्यकर्ते आणि याचिकाकर्त्यांना शुभेच्छा. तुमच्या प्रयत्नामुळे भारत हा प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्यामध्ये राहता येईल असा देश बनला आहे. चीयर्स फॉर द सुप्रीम कोर्ट.


अभिनेत्री प्रीती जिंटाने ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तिने म्हटलंय जर तुमच्याजवळ हृदय आहे, तर मग तुम्ही कोणावरही प्रेम करण्यास स्वतंत्र आहात. मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूश आहे.


अभिनेत्री अनुष्का शर्माने ट्विटरवर म्हटलंय, आज प्रेम आणि प्रेमाच्या अधिकारासाठी एक खूप मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.


हेही वाचा - 

समलैंगिकता हा गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय

नेमकं कसं आहे कलम ३७७?

संबंधित विषय
ताज्या बातम्या